{"title":"Readers Choice","description":"\u003cp\u003eReaders Choice\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"chandrakant-kulkarni-sadar-karit-ahe","title":"Chandrakant Kulkarni Sadar Karit Ahe |चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे","description":"\u003cp\u003eकवीनं असावं अल्पाक्षरी,    आणि नाटककारानं मितभाषी.        अभिनेत्यानं करावा        संहितेतील अव्यक्त आशय व्यक्त.        तंत्रज्ञानं साधावा शब्देविण संवाद.        \"ध्वनी  प्रकाश  रंग  रेषा यांनी\"        टाकावा अवकाश भारून.        \"प्रेक्षकांनी सगळं अनुभवावं \"        मूक राहून आणि एकाग्र होऊन.        समीक्षकांनी करावं        नाट्यानुभवाचं विश्लेषण अचूक.                \"पण मग ...\"        दिग्दर्शकानं काय करावं ?        \"आरंभापासून अंतापर्यंत \"        प्रत्येक क्षण उजळून टाकण्याचं        कसब शिकवावं.        मंचावरील आणि मंचामागील        \"प्रत्येकाचा मित्र  तत्त्वज्ञ\"        आणि दिशादर्शक व्हावं.                हे का आणि कसं करावं ?        \"सांगत आहेत \"        मराठी नाट्यसृष्टीतील        अग्रणी दिग्दर्शक आणि अभिनेते-        चंद्रकांत कुलकर्णी.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Rajhans Prakashan Pvt. Ltd. \/ Marathi","offer_id":44931822354605,"sku":"10696","price":800.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_2024920234850616_02c9370e-e502-4d6e-95a2-608a4af3a4cd.jpg?v=1760736604"},{"product_id":"vachu-anande-bal-gat-1-2","title":"Vachu Anande |Bal Gat 1\u0026 2) | वाचू आनंदे |बाल गट : १ \u0026 २)","description":"\u003cp\u003eदोन पुस्तकांचा संच\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Marathi","offer_id":44923625963693,"sku":"2787","price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_20191034445419_009aca10-fc7d-420b-82ab-347f9ee79624.jpg?v=1760770343"},{"product_id":"shri-raja-shivchhatrapati-part-1-2","title":"Shri Raja Shivchhatrapati | (Part 1 \u0026 2) | श्री राजा शिवछत्रपती | (भाग १ \u0026 २)","description":"\u003cp\u003eछत्रपति शिवाजी महाराज हे आम मराठी जनतेचे आराध्यदैवत आहे. तेव्हा महाराजांची जेवढी चरित्रे प्रकाशित होतील तेवढी हवीच आहेत. परंतु दुर्दैवाने अद्यापहि मराठी भाषेतील शिवचरित्रांची संख्या फारच थोडी आहे. आम्ही प्रकाशित करीत असलेल्या या शिवचरित्राने त्यात एकाची भर पडत आहेच. शिवाय, खर्‍या इतिहास-संशोधकाला साजेश्या तटस्थ वृत्तीने लिहिलेले हे एक नमुनेदार शिवचरित्र होय. लेखकाने तथाकथित ‘संशोधनात्मक स्वातंत्र्य’ न घेतल्यामुळे या शिवचरित्राला कपोलकल्पित कादंबरीचे स्वरूप न येता, हा एक विश्वसनीय ग्रंथराज झालेला आहे. तसेच, हे एका इतिहास-संशोधकाने लिहिलेले साधार शिवचरित्र असले तरी ते केवळ संशोधकांसाठी लिहिलेले आहे असे मात्र नाही. कोणाहि सामान्य वाचकाला सहज समजूं शकेल अशा भाषेत ते लिहिलेले आहे आणि म्हणूनच अनेक वृत्तपत्रांनी त्याचे भरपूर कौतुकहि केले आहे. गेली अनेक वर्ष मागणी असूनहि हे चरित्र बाजारात उपलब्ध नव्हते. वाचक त्याच्या या नव्या आवृत्तीचे पूर्वीप्रमाणेच स्वागत करतील अशी खात्री आहे.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Diamond Publications \/ Marathi","offer_id":44923787083949,"sku":"4325","price":4050.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_202253124926891_5ebf38de-a634-41cd-9f23-63360d3b511a.jpg?v=1760757942"},{"product_id":"golpitha","title":"Golpitha | गोलपिठा","description":"","brand":"Grantham","offers":[{"title":"Lokvangmaya Griha Prakashan \/ Marathi","offer_id":44923910258861,"sku":"6891","price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/001_527ac4f7-6ff4-43ce-b377-527950167b9f.jpg?v=1770206801"},{"product_id":"sakha-nagjhira","title":"Sakha Nagjhira | सखा नागझिरा","description":"\u003cp\u003eतब्बल ४०० दिवस नागझिऱ्याच्या जंगलात राहून किरण पुरंदरे यांनी अत्यंत कष्टपूर्वक गोळा केलेल्या माहितीचा ठेवा म्हणजे सखा नागझिरा. जंगालाविषयीचं अपार प्रेम आणि खणखणीत निरिक्षणं यांचा सुंदर आविष्कार या पुस्तकात झाला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Vasant Publication \/ Marathi","offer_id":44923932410029,"sku":"7484","price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_202242703836288_1481361f-77f5-430c-b63b-481374774516.jpg?v=1765205119"},{"product_id":"free-fall","title":"Free Fall | फ्री फॉल","description":"\u003cp\u003e'फ्री फॉल' हा गणेश मतकरीचा चौथा कथासंग्रह. या कथांना महानगरी जाणिवेच्या कथा असं चलनी विशेषण सहज लावता येईल. पण तसं करणं त्यांच्या आशयाच्या व्याप्तीवर अन्यायकारक ठरेल. त्या महानगरात घडणाऱ्या, पण मानवी जाणिवेच्या कथा आहेत. या जाणिवा मूलभूत मानवी अस्तित्वाशी निगडित आहेत. मानवी नातेसंबंधांचे विविध स्तर आणि गुंते, स्मृतीचा वर्तमानावर होणारा परिणाम, निवडीचं स्वातंत्र्य आणि अपरिहार्यता असे आशयघटक त्याच्या फिक्शनमध्ये आलेले आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Majestic Publishing House \/ Marathi","offer_id":44924006662317,"sku":"9207","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_20237130385999_2f83d1ab-63f0-4c80-8df4-048091976b52.jpg?v=1760740363"},{"product_id":"ahar-hech-aushadh","title":"Ahar Hech Aushadh | आहार हेच औषध","description":"\u003cp\u003eकाही केलं तरी वजन वाढतय मधुमेह कंट्रोलमध्ये येत नाहीये थायरॉइडचा त्रास होतोय या समस्यांनी किंवा आजारांनी त्रस्त आहात ? तर मग तुम्ही योग्य पुस्तक हातात घेतलंय !\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Madhushree Publication \/ Marathi","offer_id":44924014198957,"sku":"9576","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_2023112251523214_24db320d-5787-44d7-9c5e-26c3cbb3f924.jpg?v=1760775923"},{"product_id":"tv-malika-ani-barach-kahi","title":"TV Malika Ani Barach Kahi | टीव्ही मालिका आणि बरंच काही","description":"\u003cp\u003eटीव्हीविषयी माझ्या मनात प्रचंड कृतज्ञता आहे. ह्या क्षेत्रानं असंख्य कलावंत मित्रमैत्रिणींना सन्मान आणि सुबत्ता मिळवून दिलीय. अहोरात्र चालणारी ही करमणुकीची यंत्रणा मुग्धा या पुस्तकातून आपल्याला समजावून सांगते. ती आरोपीचा वकील अजिबात होत नाही. ह्या क्षेत्राला कमी लेखणा-यांना ती दूषणं देत नाही. प्रत्येक लेखातून उलगडत जाते मालिका-खिंड लढवणा-या कित्येकांच्या मेहनतीची गोष्ट. मुग्धाच्या पुस्तकाची सफर अत्यावश्यक आहे. कारण ९०³ घरांमध्ये टीव्ही आहे. कॉलेजमध्ये असताना एकांकिका विश्वात कुतुहलानं वावरत असल्यापासून मी मुग्धाला ओळखते. तिचं मोहक व्यक्तिमत्त्व बघता ती अभिनयक्षेत्रात रमणार, ही अटकळ मनाशी बांधणं सोपं होतं. पण पुढे मुंबईत स्थिरावताना तिनं मालिकांचं लेखन सुरू केलं आणि आज ती त्यातही यशस्वी आहे. मुग्धा तिच्या प्रवासात सजगपणे चालत राहिली. स्वत:च्या प्रवासाकडे ती प्रांजळपणे पाहू शकतेय. आता त्यातले बारकावे ती आपल्यासाठी खुले करतेय. अभ्यासू तरी रंजक अशी ही शोधकथा मनोरंजनासाठी आसुसलेल्या असंख्य प्रेक्षकांसाठी मोलाची ठरणार आहे. सोनाली कुलकर्णी\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Rajhans Prakashan Pvt. Ltd. \/ Marathi","offer_id":44924104376493,"sku":"10572","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_20248102657190_3146e547-b74c-466a-b0d0-699866e8cb19.jpg?v=1760746280"},{"product_id":"rooh","title":"Rooh | रुह","description":"\u003cp\u003eकाश्मिरी लोकांच्या आत्म्याला झालेल्या जखमांची हळवी कथा\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Marathi","offer_id":44924104442029,"sku":"10573","price":266.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_20248145732455_6d78ea5f-5efd-4f5c-b1c6-8cf22b7798ee.jpg?v=1760766716"},{"product_id":"gadkille-ani-mi","title":"Gadkille Ani Mi | गडकिल्ले आणि मी","description":"\u003cp\u003eपुस्तकातील प्रत्येक किल्ल्याची अचूक, नेमकी आणि स्पष्ट माहिती, किल्ल्याचं आणि तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण जागांचं आपल्या डोक्यात किल्ल्याचं एक चित्रं निर्माण करतं, प्रत्येक फोटो किल्ल्याची सुंदरता दाखवून जातो. किल्ल्यांवरील शिल्प, किल्ल्याचा इतिहास आणि भूगोल या सगळ्यांमुळे ट्रेकिंगला गेल्यावर ’नक्की गडकिल्ल्यांवर काय बघायचंय?' हा विसरत चाललेला संवाद हे पुस्तक प्रकर्षाने साधतं. किल्ल्यावर जाऊन सेल्फी, रील करण्याच्या नादात विसरत चाललेल्या, न बघितल्या जाणाऱ्या किल्ल्यावरील खरी ऊर्जा असणाऱ्या जागा, तिथली वैशिष्ट्यं आणि अवाक करणारा निसर्ग या सगळ्यांची माहिती पुस्तक भरभरून देतं. प्रत्येक पानावरील किल्ल्यांची छायाचित्रे पहिल्या पानापासून तर शेवटच्यापानापर्यंत नजर खिळवून ठेवते. गडकिल्ले आणि इतिहासावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या घरी आणि ऑफिस मध्ये असावे असे उत्तम झालेले पुस्तक. अनेक जेष्ठ इतिहासकार, दुर्गवेडे ट्रेकर्स, छायाचित्रकार यांनी गौरवलेले पुस्तक. तसेच हे पुस्तक पाहून लहान मुलांना नक्कीच गडकिल्ल्यांची आवड निर्माण होईल.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Marathidesha Foundation \/ Marathi","offer_id":44965975818413,"sku":"11231","price":900.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_202541901521366_01707eb4-aa30-471b-8b86-8c517c025d46.jpg?v=1760776439"},{"product_id":"patyara-पटयारा","title":"Patyara | पटयारा","description":"\u003cp\u003eटोकाची प्रतिकूलता आणि त्यात ‘काहीच करू शकत नाही', या भावनेतून येणारी हतबलता माणसाला बहुतांशवेळा निष्क्रिय बनवते. अशी माणसं मग त्यांच्या आयुष्यात जिवंत राहण्यापलीकडे फारसं काही करू शकत नाहीत. मात्र परिस्थितीशी जुळवून घेत प्रतिकूलतेवर मात करण्याचा प्रयत्न करणारी माणसं स्वत:ची नवी वाट निर्माण करत जगणं अर्थपूर्ण बनवतात. त्याचं प्रतिबिंब म्हणजे ‘पटयारा' हे आत्मकथन होय. \u003cbr\u003eवडिलांच्या व्यसनाधीनतेमुळे उद्ध्वस्त झालेला संसार सावरण्याच्या प्रयत्नात ढोर मेहनत करत आई मुलाला शाळेत घालण्यासाठी धडपडते. शिक्षणाची ओढ आणि वाचनाची गोडी लागलेला मुलगा आईची होणारी ओढाताण कमी करण्यासाठी परिस्थितीच्या रेट्यातून स्वत:लाही कामाला जुंपतो. पण कोणी काहीही म्हटलं, कितीही अपमान केला तरी शिक्षण आणि वाचनात खंड पडू न देण्यासाठी निगरगट्टपणा, कोडगेपणा यातून येणारं पटयारापण तो जपतो. त्याच पटयारापणातून रेखली जाते एक नवी वाट, जी संतोष शिंदे यांना धुळ्यासारख्या दुर्गम भागातून पुण्यापर्यंत घेऊन येते. इतकंच नाही, तर एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या उच्च पदावर बसवून जगभराचा प्रवास घडवते. त्याचीच ही प्रेरक गोष्ट...\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Default Title","offer_id":45249358037165,"sku":null,"price":387.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/044_7c2c9bec-6a88-45c5-a071-099284d32863.jpg?v=1765200482"},{"product_id":"nach-re-mora-नाच-रे-मोरा","title":"Nach Re Mora |  नाच रे मोरा","description":"\u003cp\u003eनाच रे मोरा  ह्या पुस्तकाद्वारे गदिमांच्या ५० वर्षांतील लिहिलेल्या विविध गीतप्रकारांचा खजिनाच जणू आपल्याला भेट म्हणून \"सौ. शीतल श्रीधर माडगूळकर\" आणि \" लीनता आलोक आंबेकर\" ह्यांनी दिला आहे. यात 'चंदाराणी' 'शेपटीवाल्या प्राण्यांची' 'एक कोल्हा बहु भुकेला' चांदोबा चांदोबा भागलास का?' यांसारखी बालगीते किंवा 'जिंकू किंवा मरू' 'वंद्य वंदे मातरम्' सारखी स्फूर्तीगीते, तसेच 'निज माझ्या पाडसा' 'निज छकुल्या' यांसारखी अंगाई गीते आकर्षक चित्रांसहित भेट म्हणून दिली आहेत. बालपणाच्या आठवणी जागवणारा आणि छोट्यांना त्यांचा बालपणीचा काळ सुखाचा करून तो चिरकाल लक्षात राहील असा हा गीतसंग्रह लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Default Title","offer_id":45282223489197,"sku":null,"price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/001_74a3f5dd-235a-45ec-86a8-01702271a643.jpg?v=1765200794"},{"product_id":"marathi-bhashetil-asabhya-mhani-ani-vakprachar-मराठी-भाषेतील-असभ्य-म्हणी-आणि-वाक्प्रचार","title":"Marathi Bhashetil Asabhya Mhani Ani Vakprachar |  मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार","description":"\u003cp\u003eएका अत्यंत दुर्लक्षित विषयावर अ. द. मराठे यांनी या पुस्तकाद्वारे प्रकाश टाकला आहे. जे शब्द चारचौघात म्हणावयास लज्जा वाटते, अथवा तसे शब्द चुकूनही उच्चारले तर असभ्य व अशोभनीय वाटतील अशा शब्दांचा वापर करून म्हणी व वाक्प्रचार जन्माला आले आहेत. या वाक्प्रचारांची अर्थासह ओळख या पुस्तकातून होते.\u003cbr\u003eहे साहित्य जरी असभ्य वाटले, तरी ते लोकजीवनाचा नैसर्गिक आविष्कार आहे. त्यामुळे त्यांचे महत्वही अधिक आहे. पुस्तकात म्हणी सांस्कृतिक पाश्वभूमीवर देऊन मानसशास्त्रीय व समाजील पैलूंवर प्रकाश टाकला आहे. म्हण म्हणजे काय वाक्प्रचार व असभ्यार्थकसूचक संकेत अशी स्वतंत्र प्रकरणे आहेत. उत्तरार्धयुक्त म्हणी, समानार्थी सभ्य-असभ्य म्हणी सांगितल्या आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Default Title","offer_id":45404230189229,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/003_2c75021a-9d18-42a9-a8fe-411d1bf81904.jpg?v=1765203267"},{"product_id":"atmacharitraaivaji-आत्मचरित्राऐवजी","title":"Atmacharitraaivaji |  आत्मचरित्राऐवजी","description":"\u003cp\u003eजयवंत दळवींच्या मते, खरी आत्मचरित्रे लिहिणे हे धाडसाचे काम आहे. हे पुस्तक 'आत्मचरित्र' या पुस्तकाला पर्याय म्हणून लिहिले आहे. या पुस्तकात दळवींच्या आठवणी आणि विचार मांडलेले आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Default Title","offer_id":45407630655661,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/015_ba59da7e-367a-45f0-9c0e-afd507147f1b.jpg?v=1765200754"},{"product_id":"rangvimarsh-रंगविमर्श","title":"Rangvimarsh|  रंगविमर्श","description":"\u003cp\u003eरंगविमर्श या लेखसंग्रहात प्रा. नरहर कुरुंदकरांनी केलेले नाट्यविषयक लिखाण आहे. \u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Default Title","offer_id":45407676203181,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/002_e55e0646-4b6f-4101-83fe-bd34633586d1.jpg?v=1765201383"},{"product_id":"walong-eka-yuddhakaidyachi-bakhar-वालाँग-एका-युध्दकैद्याची-बखर","title":"Walong Eka Yuddhakaidyachi Bakhar | वालाँग एका युध्दकैद्याची बखर","description":"\u003cp\u003eहे पुस्तक १९६२ च्या भारत-चीन युद्धात चीनने भारतीय सैनिकांना कैद केल्याच्या अनुभवावर आधारित एक चित्तथरारक शौर्यगाथा आणि युद्धकैदी म्हणून भोगलेल्या हालअपेष्टांचे हृदयस्पर्शी वर्णन आहे, जे वाचायलाच हवे असे आहे. \u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Default Title","offer_id":45429647573165,"sku":null,"price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/001_71fce8dd-32d6-4750-8726-7f71d88abfa7.jpg?v=1765213232"},{"product_id":"geet-ramayan-गीत-रामायण","title":"Geet Ramayan | गीत रामायण","description":"\u003cp\u003eमराठीमध्ये 'गीत रामायण' हे ग.दि. माडगूळकर यांनी लिहिलेले आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले ५६ गाण्यांचे एक प्रसिद्ध काव्य आहे, जे रामायणातील घटनांचे वर्णन करते. हे पुस्तक रामायणातील कथा काळाक्रमानुसार, भावपूर्ण संगीताच्या साहाय्याने सांगते, जे आकाशवाणीवर १९५० च्या दशकात खूप गाजले होते आणि आजही मराठी भाषिकांमध्ये लोकप्रिय आहे. \u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Default Title","offer_id":45472008470701,"sku":null,"price":99.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/001_2ea8a348-72d0-4f7d-81ef-3b6771fd6cdd.jpg?v=1766497077"},{"product_id":"the-naga-warriors-battle-of-gokul-vol-1","title":"The Naga Warriors Battle of Gokul - Vol. 1","description":"\u003cp\u003eIn the year 1757, 111 Naga sadhus borrowed the majestic weapons of the idols of their gods. Fueled by their belief in Lord Shiva, they gathered an invincible courage to protect the temples of Gokul. They stood as an indestructible wall, led by Ajaa, a fearless Naga warrior, against the Afghan army of 4000 men, a cavalry of 200 horses and 100 camels, and 20 cannons. The brutal Afghan army was led by Sardar Khan, the most ruthless commander of Emperor Ahmed Shah Abdali, ill-famed for the demolition of temples and building a history of genocide in Bharat. The fight continues. This is the Naga warrior’s commitment to courage and determination. This is the clash of Shiva devotees against the devils that lie under men’s skin. This is the Battle of Gokul.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Default Title","offer_id":45545121480877,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/001_0435f63b-4957-49d6-893d-9b4cb4485784.jpg?v=1767620164"},{"product_id":"strimukticha-atmasvar-स्त्रीमुक्तीचा-आत्मस्वर","title":"Strimukticha Atmasvar | स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eलोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी मराठी संत कवयित्रींची मुक्तिसंकल्पना आणि स्त्रीमुक्ती या मध्यवर्ती संकल्पनेविषयीचे सहा लेख या संग्रहात एकत्रित केले आहेत. संशोधकाचा पिंड असल्याने या पुस्तकामागची भूमिका आणि समारोप-संदर्भसूची-परिशिष्टे यांचीही जोड दिलेली आहे. १९९४ साली प्रकाशित झालेल्या संग्रहाची ही दुसरी आवृत्ती आहे. भारतातील संत चळवळ ही सामाजिक मुक्तीची चळवळ होती.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपरंपरेच्या शृंखला पायात अडकवून चार भिंतीच्या आतच ठेवलेल्या स्त्रियांना आत्मस्वर देण्याचा प्रयत्न या चळवळीतील संत कवयित्रींनी केला. तो करताना त्यांनी सामाजिक शोषणाच्या आणि स्त्री शोषणाच्या विरोधात कुठल्या प्रकारे बंडखोरी केली, त्याची चर्चा या पुस्तकामध्ये भवाळकर यांनी केली आहे. त्या वेळची परिस्थिती आजच्यापेक्षा खूप वेगळी आणि कर्मठ होती, त्यामुळे त्याविरोधातल्या बंडखोरीची हत्यारेही वेगळी होती.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएका स्वतंत्र प्रकरणात भवाळकर यांनी आजच्या स्त्रीचळवळीचा या संत कवयित्रींच्या चळवळीशी काय अनुबंध आहे, याचाही ऊहापोह केला आहे. त्यामुळे स्त्री चळवळीच्या अभ्यासकांपासून सर्वसामान्य महिलांपर्यंत ते सुशिक्षित महिलांपासून अशिक्षित महिलांपर्यंत- ज्यांना या विषयात रस आहे, त्यांना हे पुस्तक स्वारस्यपूर्ण वाटू शकेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Default Title","offer_id":45634651783341,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/001_0f23943f-38fe-4521-9534-cf94fb165633.jpg?v=1768917019"},{"product_id":"radha-राधा","title":"Radha | राधा","description":"\u003cp\u003eश्रावणी नावाची बावीस वर्षीय तरूणी दुःखातून बाहेर पडण्यासाठी आणि भविष्याबाबत शांतपणे चिंतन करण्यासाठी वृंदावनात जाते. तिथे तिला अ नपेक्षितपणे Radha ( राधा ) भेटते. श्रावणीला काही प्रश्नांची उत्तरं हवी असतात. ती राधेला ते प्रश्न विचारते. राधा त्या प्रश्नांची उत्तरं देतांना वृंदावनातील तिच्या आठवणीही सांगते. श्रीकृष्ण आणि राधेचं नातं श्रावणीला राधेच्या दृष्टीकोनातून समजतं. त्या दोघींच्या संवादातून प्रेम, पुरूष आणि नैतिकतेचे अनेक पैलू उलगडतात. तेच हे एक कादंबरीमय उपनिषद .\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Default Title","offer_id":45800095056045,"sku":null,"price":261.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/001_b87d6d52-734f-44ce-aeb2-2348164397f9.jpg?v=1773063339"},{"product_id":"hasari-moglai-हसरी-मोगलाई","title":"Hasari Moglai | हसरी मोगलाई","description":"\u003cp\u003eहे औरंगजेबाच्या कारकिर्दीतील मजेशीर आणि विनोदी किस्से सांगणारे मराठी पुस्तक आहे, जे निकोलाओ मनूचीच्या 'स्टोरिया डो मोगोर' या ग्रंथावर आधारित आहे. हे पुस्तक इतिहासाकडे पाहण्याचा एक वेगळा आणि हलका-फुलका दृष्टिकोन देते.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Default Title","offer_id":45825393688749,"sku":null,"price":68.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/001_e22ed397-4cff-4160-b8e6-e5520d7a56dc.jpg?v=1773754551"},{"product_id":"kas-ayam-pratham-vivah-kalnirnay-कास-आयाम-प्रथम-विवाह-कालनिर्णय","title":"Kas Ayam Pratham Vivah Kalnirnay | कास आयाम प्रथम विवाह कालनिर्णय","description":"","brand":"Grantham","offers":[{"title":"Default Title","offer_id":45956896784557,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/005_4c8d8621-ebc1-4ced-939d-7b992e2c0c7e.jpg?v=1777383368"}],"url":"https:\/\/www.grantham.in\/collections\/readers-choice.oembed?page=2","provider":"Grantham","version":"1.0","type":"link"}