{"title":"Stories","description":"\u003cp\u003eStories\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"paus","title":"Paus | पाऊस","description":"\u003cp\u003eआनंदपूर गावात सगळे लोक सुखात राहायचे. हळूहळू पाऊस कमी झाल्याने नदीचे पाणी अडवून तळे बांधायचे ठरले. पण तळ्याला नाव काय द्यायचे यावरून ठिणगी पडली आणि...    \"शेवटी राजू  रफिक  जसप्रीत आणि इतर मुलांची प्रार्थना ऐकून खुशीने बरसलेल्या पावसाची ही गोष्ट.\"\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Marathi","offer_id":44995976888493,"sku":"9883","price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_202412003450656.jpg?v=1765204019"},{"product_id":"davabindu","title":"Davabindu | दवबिंदू","description":"\u003cp\u003eवि.स. खांडेकर यांच्या २० कथांचा संग्रह. या कथा वाचकाला सात्विक आणि वाङ्मयीन आनंद देतात.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44994733080749,"sku":"3639","price":99.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_201992841844661.jpg?v=1765206259"},{"product_id":"punha-ekda","title":"Punha Ekda | पुन्हा एकदा","description":"\u003cp\u003eमाणसांच्या मनातल्या गुंतागुंतीला हळुवारपणे हात घालणाऱ्या आणि वाचकाला आपल्यासोबत घेऊन जाणाऱ्या कसदार कथा.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Samakalin Prakashan \/ Marathi","offer_id":44994639855789,"sku":"2826","price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_20225205360393.jpg?v=1765226160"},{"product_id":"agantuk","title":"Agantuk | आगंतुक","description":"","brand":"Grantham","offers":[{"title":"Vishwakarma Publications \/ Marathi","offer_id":44996019912877,"sku":"10155","price":234.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_202432664352614.jpg?v=1765228647"},{"product_id":"investment","title":"Investment | इन्व्हेस्टमेंट","description":"\u003cp\u003eरत्नाकर मतकरी यांच्या, वास्तववादी शैलीतल्या ८ कथांच्या या संग्रहामध्ये आजच्या समाजजीवनातील अधोगतीचे चित्रण, भरगच्च तपशिलासह केलेले आहे. या कथांमधून, आजच्या अनेक भीषण सामाजिक समस्यांवर मतकरी भाष्य करतात. मात्र, अनेक पातळ्यांवर भ्रष्ट होत चाललेल्या या समाजातही अधूनमधून डोकावणाऱ्या , नैतिकता, प्रेम, तत्त्वनिष्ठा, धैर्य इत्यादींची दखल ते आवर्जून घेतात. या कथांसाठी अनेकविध शैली वापरण्यामधून मतकरींमधला नाटककारही दिसून येतो.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Majestic Publishing House \/ Marathi","offer_id":44995096805549,"sku":"5575","price":203.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_2020113184457.jpg?v=1765216225"},{"product_id":"kamala","title":"Kamala | कमला","description":"\u003cp\u003eएकोणिसाव्या शतकात कृपाबाई सत्यनादन यांनी इंग्रजी कादंबरी लिहिली, ही घटनाच महत्वपूर्ण.बुद्धीचे वरदान लाभलेल्या कृपाबाईंनी प्रकृती अस्वास्थ्याला तोंड देत लेखन केले.मुस्लिम शाळाही काढली.'कमला' या त्यांच्या पुस्तकरूपाने प्रकाशित झालेल्या पहिल्या कादंबरीचा हा अनुवाद.या कादंबरीत एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील कौटुंबिक - सामाजिक वातावरणाचे दर्शन घडते.पारंपारिक चौकटीतून बाहेर पडून नवे भान स्वीकारणारी ही नायिका !\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Rajhans Prakashan Pvt. Ltd. \/ Marathi","offer_id":44995087270061,"sku":"5525","price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_20191229223050277.jpg?v=1765203078"},{"product_id":"janata-ajanata","title":"Janata Ajanata | जाणता अजाणता","description":"\u003cp\u003eवाचकाला अस्वस्थ करणाऱ्या ,विचार करायला लावणाऱ्या  'योगिनी वेंगुर्लेकर' यांच्या कथा..\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Vishwakarma Publications \/ Marathi","offer_id":44995225256109,"sku":"6149","price":203.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_2020127162313139.jpg?v=1765223720"},{"product_id":"gulmohar","title":"Gulmohar | गुलमोहर","description":"\u003cp\u003eगुलमोहराचं झाड केव्हाही छान दिसतं. निळ्या निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर ते जेवढ्या डौलानं शेंडे वर करून डुलतं, तेवढ्याच श्रीमंतीनं - काळ्याभोर पावसाळी ढगांवरसुद्धा वैभवशाली दिसतं, भव्य वाटतं. पण दिवाकरपंतांना गुलमोहराचं झाड आता बघवेना. तो त्यांचा पराभव होता, भंग पावलेलं स्वप्न होतं. लाकूडतोड्या झाडावर सरड्याप्रमाणे चढला. वरच्या फांदीवर पहिली कुर्‍हाड बसली आणि त्या पहिल्या घावानं दिवाकरपंतांच्या आख्ख्या भूतकाळातील आठवणींवर तडाखा हाणला. दुसर्‍या घावासरशी त्यांचा भविष्यकाळ नष्ट केला. तिसरा घाव बसला आणि दिवाकरपंतांना प्लॉटचा वर्ष वाढदिवस आठवला. घावाघावागणिक आठवणींचा मोहर झोडपला जात होता. खाली पडणार्‍या फांद्या चुकवीत चुकवीत दिवाकरपंत तांबडी फुलं भराभर वेचत होते. घावावर घाव बसत होते. झाडाची उंची कमी होत होती, दिवाकरपंतांचं स्वप्नही लहान लहान होत होतं.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44994552594605,"sku":"1475","price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_2022926234952886.jpg?v=1765226937"},{"product_id":"we-the-people","title":"We The People | वुई दि पीपल","description":"\u003cp\u003eभारतासारखा निसर्गसंपत्तीच्या बाबतीत समृद्ध असलेला देश सरकारी धोरणांमुळे कसा अतिशय गरीब अवस्थेत राहिला आहे, याचे नानी पालखीवाला यांनी या पुस्तकात मार्मिक विवेचन केले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44994727182509,"sku":"3540","price":293.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_201992555911968.jpg?v=1765218648"},{"product_id":"chahul-udyachi","title":"Chahul Udyachi | चाहूल उद्याची","description":"\u003cp\u003eसुबोध जावडेकरांच्या विज्ञानकथांमध्ये फोकस विज्ञानावर नसतो; विज्ञानामुळे बदलत चाललेल्या माणसा-माणसांतल्या नातेसंबंधांवर असतो.समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण करणारं औषध निघालं तर ... एखाद्याच्या स्मृतीतली विशिष्ट आठवणच तेवढी पुसून टाकायचं तंत्रज्ञान आलं तर शत्रुराष्ट्राचे सगळे कंप्युटर्स हॅक करून युद्ध न करताच त्या देशावर ताबा मिळवता आला तर ... अशा शक्यतांचा वेध जावडेकर आपल्या कथांमधून घेतात.या संग्रहात सगळ्याच कथा काही विज्ञानकथा नाहीत; नर्मविनोदी शैलीतल्या, औद्योगिक विश्वात घडणाऱ्या कथाही आहेत. पण इथेसुद्धा त्यांची लेखणी कॉर्पोरेट जगातली गुंतागुंत रंगवण्यापेक्षा माणसांच्या मनांतला गुंता शोधण्यात अधिक रमते.थोडक्यात, जावडेकरांच्या कथा या 'उद्याच्या जगाची चाहूल घेणान्या असतात.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Majestic Publishing House \/ Marathi","offer_id":44995124592813,"sku":"5773","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_202011044659901.jpg?v=1765200595"},{"product_id":"shadja","title":"Shadja | षड्ज","description":"\u003cp\u003e'षडज हा चंद्रकांत वर्तक यांचा तिसरा कथासंग्रह. अनेकविध अनुभव घेतलेल्या वर्तकांच्या चौदा कथा या संग्रहात आढळतात. मध्यमवर्गातील नाती व या नात्यांमधील ताणतणाव हे या संपूर्ण कथांचे सूत्र म्हणावयास हरकत नाही.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Majestic Publishing House \/ Marathi","offer_id":44995185344685,"sku":"5960","price":108.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_202012417457904.jpg?v=1765219844"},{"product_id":"don-ghadicha-dav","title":"Don Ghadicha Dav | दोन घडीचा डाव","description":"","brand":"Grantham","offers":[{"title":"Aabha Prakashan \/ Marathi","offer_id":44923269284013,"sku":"242","price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_202251853335702.jpg?v=1760758681"},{"product_id":"aik-sakhe","title":"Aik Sakhe | ऐक सखे","description":"\u003cp\u003eऐक सखे... वसंत पुरुषोत्तम काळे यांचे हे पंचविसावे पुस्तक एका निराळ्या पद्धतीने छापलेले. गोष्टीतून गोष्टी सांगत जाणारे, ‘अरेबियन नाइट्स’सारखे त्याचे स्वरूप आहे.त्यांच्या कथा अर्थवाही अन् भावप्रधान आहे; पण त्यांचे कथाकथन मात्र एकदम रसरशीत आणि चैतन्यदायी आहे. त्यात त्यांचे शब्द काही खास ढंगाने, काही खास जिव्हाळ्याचे, कधी आर्ततेने, तर कधी उन्मादाने नवे रूप धारण करतात. त्यातील माणसेही कोणी असामान्य नाहीत. अवतीभोवती असणार्यास लहान माणसांचे मोठेपण आणि मोठ्या माणसांचे लहानपण हेच त्यांच्या लेखनात सापडते. त्यांच्या लेखनात सहजता आहे, सौंदर्य आहे; तोरा आहे.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923545125037,"sku":"1471","price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_20229276615239.jpg?v=1765211188"},{"product_id":"kahi-khara-kahi-khota","title":"Kahi Khara Kahi Khota | काही खरं काही खोटं","description":"\u003cp\u003eकथा वपुंची-तुमची आमची सगळ्यांची- जीवनाचे पुस्तक उघडल्याची असे ह्या कथासंग्रहाबद्दल म्हटले गेले आहे ते खरे आहे- ह्या संग्रहातील 'जे.के.’, 'भदे’, यासारख्या वपुंच्या गाजलेल्या कथा ह्याची साक्ष आहे. ही व्यक्तिमत्त्वे आपल्यासारखेच दैनंदिन जीवन जगत असतात तरीही त्यांच्या वागण्या-बोलण्यात, जीवनाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात फरक असतो. या फरकामुळे हे जीवन अधिकच 'जिवंत’ झालेले असते. वपु नेमके तेच हेरतात आणि ते इतक्या सहज शैलीत वाचकांना विश्‍वासात घेत वाचकांपुढे ठेवतात की त्यांनाही वाटते, जगावे तर हे असे. वपुंच्या सर्व ज्ञात वैशिष्ट्यांबरोबरच जीवन चेतना देणे हेही त्यांचे एक वैशिष्ट्य !\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923545190573,"sku":"1472","price":198.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_2022926235637114.jpg?v=1760721927"},{"product_id":"swar","title":"Swar | स्वर","description":"\u003cp\u003eकाही काही रागदारीत काही काही स्वर वर्ज्यच असतात... वर्ज्य झालेला स्वर वाईट असतो म्हणून वगळायचा नसतो. तर एक राग उभा करण्यासाठी आपण तो खुशीनं विसरायचा असतो... वाद्यातल्या तेवढ्या पट्ट्या उपटून फेकायच्या नसतात, त्यांना फक्त चुकवायचं असतं...! म्हणून तुझ्या आठवणीत, सहवासात माझा नवरा बसू शकत नाही आणि एकमेकांच्या संसारात आपणा एकमेकांना स्थान नाही लोकप्रिय कथाकार वपु काळे अतिशय सहजतेनं अशी चपखल उदाहरणं देऊन आयुष्यातली गुंतागुंत सोपी करण्याचा नेमका धागा आपल्या हाती देतात. त्यांच्या सर्वच कथांमध्ये कथेच्या ओघात मिसळून असं चिंतन येतं आणि ते वाचकांना विचार करायला लावतं. मुळात कथा अतिशय खुमासदार; सहसा कुणाच्या ध्यानीमनी न येणार्‍या क्षणांच्या, घटनांच्या झालेल्या. त्याची अभिव्यक्ती असते वपुंच्या खास मिस्कील शैलीत! त्यांच्या लेखनातील जीवनविषयक प्रसन्न, उदार, आशावादी दृकिोनामुळे त्यांची प्रत्येक कथा वाचकाचं मन जिंकून घेते. 'स्वर’मधील कथाही वाचून संपल्या तरी मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतील...\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923545256109,"sku":"1473","price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_202292623744345.jpg?v=1760729237"},{"product_id":"ghar-haravleli-manas","title":"Ghar Haravleli Manas | घर हरवलेली माणसं","description":"\u003cp\u003eमुंबईसारख्या शहरात राहून आपल रोजचं आयुष्य जगणार्‍या मध्यमवर्गीय माणसांची होणारी कुचंबणा या कथातून मांडलेली आहे. चाळीतलं वास्तव्य, लहान जागा याबरोबरच विसंवादाचे उठणारे सूर यानं माणसाचं जीवन अवघड करून टाकलं आहे.    \"आयुष्याचं संगीत तीन स्वरात विभागलेल बालपण  तारूण्य आणि वार्धक्य. सर्वाधिक उमलण्याचा  फुलण्याचा  उत्कटतेचा काळ तो तारूण्याचा शरीराचे  मनाचे  भावनांचे  संवेदनांचे  कर्तृत्वाचे सगळे उत्सव बहराला येण्याचा काळ.पण तारूण्यातच अनेक प्रकारच्या कुंचंबणेनं माणसाचं आयुष्य बांधून टाकलेलं. अनेक संसारातून यामुळं उठलेले विसंवादाचे सूर  हे अस्वस्थ करणारे जखम करणारे.पाचशे स्क्वेअर फूटच्या घरात 10-10 माणसं राहतात. त्यांच्यातले नाते संबंध  पतीपत्नीला हवा असेलेला एकांत  स्वस्थपणा. ही अप्राप्य गोष्ट. आणि त्यासाठी असे क्षण खेचून घेणं म्हणजे सगळीच विटंबना. तीस माणसासाठी एकच संडास आणि रोजच्या नित्यकर्मासाठी करावी लागणारी रोजची धडपड हे सर्व कीव आणणारं आहे. अनंत प्रश्न उभे करणारं आहे. माणसं घरात राहतात. कधी कधी एकमेकांत कधीत न कोसळणार्‍या भक्कम भिंती उभारून अशा अनेक प्रश्नांच्या या कथा. प्रत्येकला आपल्या वाटणार्‍या ...\"\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923545321645,"sku":"1474","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_2022926232915140.jpg?v=1760766487"},{"product_id":"chaturbhuj","title":"Chaturbhuj | चतुर्भुज","description":"\u003cp\u003eदोनाचे चार हात झाले, की सगळ्या चिंता मिटल्या... हा एक समज, पण आयुष्याचे खरे सूर तर इथूनच झिरपू लागतात. रोजच्या जगण्यातली मोठी-मोठी स्थित्यंतरं... भावनिक, मानसिक आंदोलनं... आणि सुखाची आवर्तनं... हे सगळं गुंफून राहतं केवळ 'लग्न' या शब्दाभोवती ! 'चतुर्भुज' कथेतला चिंतातूर वर, 'चुडा' मधील वधुपक्षाची केविलवाणी दैना, 'अंतर' मधल्या दोन मैत्रिणींची लग्नामुळे पालटलेली आयुष्यं आणि 'बलिदान' मधील नियतीच्या फे-यात अडकलेली बायको... आपल्याच आजूबाजूची ही पात्रं खास 'वपु' शैलीतून अवतरलेली... त्यांच्या बहारदार लेखणीतून बहरलेली...\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923545551021,"sku":"1476","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_202292623185448.jpg?v=1765220691"},{"product_id":"vapurvai","title":"Vapurvai | वपूर्वाई","description":"\u003cp\u003eश्रेष्ठ कथाकथनकार’ म्हणून वपुंची असलेली ओळख ही त्यांची अनेक मनोरम वैशिष्ठ्ये सिध्द करते. मनाची पकड घेणारी कथा लिहणारे लेखक, कथेतील पात्रे जीवंत करणारे, श्रोत्यांना गुंतवून ठेवणारे कथनकार आणि या सर्वांमागे सूप्तपणे उभे असलेले डोळस रसिक तत्वचिंतक! प्रत्येक कथेतून वपु वाचकांना भेटत असतात. एकाच वेळी अनेकांना अंतर्मुख करणारी, बहिर्मुखातून अंतर्मुखता देणारी; लोकरंजनातून वैचारिकतेकडे झुकणारी अशी वपुंची कथा असते. ज्यांच्या कथेतून अनोख्या प्रतिमांमधून सतत माणूसपणाचा उद्घोष असतो. वेगवेगळ्या परिस्थितीत सापडलेली, संघर्ष करणारी, हसणारी, रडणारी, कुढणारी सर्वसामान्य माणसं आणि त्यांच्यातली असामान्यत्वाची झलक वपुंनी नेमकी पकडलेली असते. आपल्या प्रसन्न, खुमासदार, मिश्किल शैलीतील -- आविष्कार कथा वाचनीय आणि श्रवणीयही करतो. वपुंच्या खास कथांची ही वपुर्वाई वाचकांना अपुर्वाईची ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923545813165,"sku":"1477","price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_202292761657191.jpg?v=1765231227"},{"product_id":"mahotsav","title":"Mahotsav | महोत्सव","description":"\u003cp\u003eसगळी थोर, रसिक वाचक मंडळी आपापल्या आवडत्या लेखकाला एक ठराविक प्रश्न का विचारतात?- तो प्रश्न म्हणजे, \"तुम्हाला अशी व्यक्ती प्रत्यक्ष भेटली होती का हो?\"- खरं तर अशा व्यक्ती आपल्या आसपास असतात. काही घरी चालून येतात. वाचकांना जाणीवही नसेल की, अशा कितीतरी व्यक्ती त्यांच्या शेजारूनही जात असतील की ज्यांनी काही ना काही साधना केली असेल. कुणी कवी, कुणी गणितज्ज्ञ, कुणी काही, काही, कुणी काही. असाच एखादा (किंवा एखादी) कुणा लेखकाला भेटतो (भेटते) मग वाटतं, समाजापर्यंत ह्या व्यक्तीला न्यायलाच हवं.’ असे खुद्द 'वपुं’नी 'महोत्सवारंभी’च म्हटले आहे आणि त्यांच्या ह्या लेखनाचे सूत्र आहे म्हणूनच येथे वाचकांनाही त्यांच्या आजूबाजूच्याच व्यक्ती भेटतात पण त्या येथे वपुंच्या लेखणीतून भेटण्याची खुमारी काही वेगळीच आहे.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923545911469,"sku":"1478","price":207.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_202292755117798.jpg?v=1760742455"},{"product_id":"bhulbhulaiyya","title":"Bhulbhulaiyya | भुलभुलैय्या","description":"\u003cp\u003eभुलभुलैय्या नावाची चमत्कारच वाटावा अशी एक वास्तु लखनौला आहे. वपुंच्या ह्या संग्रहातील घसघशीत बावीस कथा म्हणजे असा चमत्कारच चमत्कार आहे पण तो चक्रातून टाकणारा नसून त्यातील मजा लुटायला लावणारा आहे. हातचे सोडून पळत्या पाठीमागे लागणे व्यर्थ आहे, जे काही आपले आहे ते आपलेच आहे हा विचार वपु ह्या सार्‍यातून नकळतपणे वाचकाच्या मनावर बिंबवून गेले आहेत. अगदी 'चष्मा' पासून 'बाई, बायको, कॅलेंडर'पर्यंत. \"ब्रह्मदेवाचा बाप आला तरी ते शक्य होणार नाही\" असे उठसूट म्हणणार्‍या राहूलकरांचीही कानउघडणी वपुंनी प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाच करायला लावली आहे आणि त्यांच्या 'सुवर्णतुला'त कृष्ण, रुक्मिणी, सत्यभामा सारे आले आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923545977005,"sku":"1479","price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_2022635249751.jpg?v=1760760834"},{"product_id":"rang-manache","title":"Rang Manache | रंग मनाचे","description":"\u003cp\u003eअकरा कथांचा संग्रह. कथा जरी अकराच असल्या तरी व. पु. काळे ह्यांच्या चुरचुरीत लेखनाची खुमारीच ही आहे की आजूबाजूचे सारे विश्व ह्या ना त्या प्रकारे त्यात टिपले गेलेले असते. वपु नेमकेपणा टिपणारे छायाचित्रकारही होते. तोच गुण त्यांच्या लेखणीतही उतरला आहे म्हणूनच 'गॅरण्टी’, 'बघतात तुला, पण...’, 'आणि तसं झालं तर...’ सारख्या ह्या संग्रहातील कथा 'असंही असू शकतं’, 'हे असंच आहे’ असे वाटायला लावणार्‍या आहेत. हे सारे वपुंच्या शैलीत वाचणे हा एक वेगळा आनंद आहे. वपु केवळ मिस्कील लेखक नाहीत तर विचार करायला लावणारे मिस्कील लेखक होते ह्याची प्रचिती यावी असा हा मनाच्या रंगाची उधळण करणारा कथासंग्रह.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923546075309,"sku":"1480","price":234.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_2022926231146101.jpg?v=1760761923"},{"product_id":"hunkar","title":"Hunkar | हुंकार","description":"\u003cp\u003eतारुण्य-आयुष्यातील सळसळत्या उत्साहाचा काळ.प्रेम करण्याचा, प्रेमात हरवण्याचा, प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याचा. स्वत:ची झालेली फट्फजिती कबूल करण्याचा, दुसर्‍याची गंमत मजेत दुरून बघण्याचा, पण कधीकधी भलतीच ठेच लागते, अगदी जिव्हारी लागते. विसरू म्हणता विसरता येत नाही. नकळत झालेली चूक स्वीकारताही येत नाही. वास्तवाला सामोरे जायचे धैर्यही कधीकधी दाखवावे लागते. संसारात पडल्यावर दुखरा कोपरा मनात ठेवून काहीजण जगतात, काही त्यातून बाहेर येतच नाहीत. मागचे भोग विसरून वाटेला आलेला संसार टुकीने, नेटकेपणाने करणारे असतात. तर व्यवहारात भलत्याच काळ्या वाटेने जाऊन काहीजण फसवे सुख मिळवतात.प्रेमाच्या निरनिराळ्या छटा, त्यातील आततायीपणा, जोम, परिस्थितीमुळे असफल झालेल्या प्रेमातील वेदना, कारुण्य, संसारातले वास्तव, तडजोड, सच्चेपणा, मुलांबद्दलचा उमाळा, हळवेपणा या सार्‍या अवस्था वपुंनी या संग्रहातील वेगवेगळ्या कथांमधून चितारल्या आहेत. कधी विनोदाने मनाला खुदकन हसवणार्‍या, कधी डोळ्यांच्या कडा ओल्या करणार्‍या, तर कधी सरळ सत्याला भिडणार्‍या अशा या कथा आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923546239149,"sku":"1481","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_202271472650851.jpg?v=1760743996"},{"product_id":"vapu-85","title":"Vapu 85 | वपु ८५","description":"\u003cp\u003eवपुंची कथा ही जन्मजात वैशिष्ठ घेऊन आली आहे. तिनं परंपरेला सोडलं नाही अणि नवतेला अव्हेरले नाही. मराठी कथेच्या इतिहासात जे जे प्रवाह आले त्या प्रवाहातील चमकती वैशिष्ठे वपुंच्या कथेत आढळतात. हरिभाऊ आपट्यांचे कथन कौशल्य, असलेली मानवी मने उकलणारी पण बोजड मनोविश्लेषणात्मक नाही. अशी वपुंची कथा वाटते. ती खास संसारकथा आहे आणि ती ही मध्यमवर्गाची. ही मध्यमवर्गीय माणसे दु:खी आहेत.सुखी आहेत सुखदु:खमिश्रित आहेत. पण संसाराशी ऐक्य सांधणारी आहेत. ती संसारात राहूनही स्वत:चे घर हरवून बसतात. आणि त्यांच्या कथा मात्र रसिकांच्या मनात घर करुन राहतात. वपुंच्या संसारकथा पुन्हा पुन्हा ऐकाव्याश्या,वाचाव्याश्या वाटतात. कारण त्या तडजोडवादी आहेत. आणि संवादी आहेत कथा वाचकांच्या मनात आपुलकी निर्माण करते. 'बॉनसाय’ या कथेतील चित्रे आपल्याला वेगळे वाटतात. खुरटलेल्या, एकांगी, स्वयंकेंद्रित व्यक्तिचं हे चित्र मनाची पकड घेत. रसिकांचे अंत:करण ओढून घेणारी, मने जिंकणारी अशी ही वपुंची कथा आहे. या संग्रहातील कथा ही सर्व वैशिष्ठ्ये घेऊन अवतरल्या आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923546304685,"sku":"1483","price":126.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_20229262311930.jpg?v=1760731162"},{"product_id":"sakhi","title":"Sakhi | सखी","description":"\u003cp\u003eसखी पासून 'झकासराव' पर्यंत नऊ कथांद्वारे वाचकांना निर्मळ आनंद देणारा वपुंचा हा कथासंग्रह. ह्यात केवळ हा आनंदच मिळतो असे नाही तर जीवनाकडे कोणत्या दृष्टीने बघावे आणि आला क्षण कसा सुखद करावा ह्याचीही नकळत शिकवण मिळते. खुद्द लेखकाची अशी एक स्वच्छ दृष्टी आहे आणि हा दृष्टिकोन सहजगत्या मांडण्याचे कसब त्यांना साधले आहे म्हणून लेखकाची 'सखी' वाचकाचीही 'सखी' होऊन जाते. तसे झाल्याने लेखकाला दुस्वास वाटणे शक्यच नाही कारण तसे व्हावे म्हणून तर त्याने हा लेखनप्रपंच केला असावा ! नव्हे केला आहेच ! वपुंचे एक वाक्य आहे - \"सावली देऊ शकणार्‍या वटवृक्षानं विश्रांतीला आलेल्या पांथस्थाला बाकीची झाडं सोडून तुला नेमका मीच सापडलो का, असं विचारायचं नसतं !\"\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923546370221,"sku":"1484","price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/001_f12536c7-378b-404b-8ea9-9da4ef5a05ed.jpg?v=1779883674"},{"product_id":"valay","title":"Valay | वलय","description":"\u003cp\u003eआपली आधुनिक जीवनशैली – त्यामुळे निर्माण होणारे अनेकाविध प्रष्ण, मानवी नात्यातील विलक्षण गुंतागुंत, स्त्री-पुरुष संबंधातील भावनिक-मानसिक तरलता यांचा सहज सुंदर आविश्कार करणाया मराठीतील कसदार ज्येष्ट लेखिकेचा कथासंग्रह.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Vijay Prakashan \/ Marathi","offer_id":44995878355117,"sku":"9371","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_202392721713596.jpg?v=1760738645"},{"product_id":"zopala","title":"Zopala | झोपाळा","description":"\u003cp\u003eमनाच्या विविध रंगछटांचं दर्शन वपुंच्या या पुस्तकातून घडतं यातल्या प्रत्येक कथेतला वेदनेचा अंत:स्त्रोत वाचकांना वेढून टाकतो. या वेदनेसह जगणाऱ्या मनस्वी व्यक्तींच्या मनस्वी कथा आपल्याला अंतर्मुख करतात. स्वत:चा ोध घ्यायला भाग पाडतात. या कथांमधील माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदु:खे, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्ने ही आपल्या आजूबाजूलाच आढळणारी आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात कधीतरी घडलेले असतात किंवा इतरांच्या आयुष्यात त्याचे प्रतिबिंब बघितलेले असते आणि म्हणून ती माणसे आपली वाटतात. छोट्याशा कथाबीजाचे फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेत रूपांतर करण्याचे वपुंचे कसब व सामर्थ्य, साध्या सोप्या संवादातून जीवनाचे एखादे तत्त्वज्ञान सांगण्याची त्यांची हातोटी, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला वेगळेच बळ देतो.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923546501293,"sku":"1486","price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_2022926235135170.jpg?v=1765224837"},{"product_id":"mayabazar","title":"Mayabazar | मायाबाजार","description":"\u003cp\u003eवपुंच्या कथाविश्वात मध्यमवर्गीय जीवन केंद्रवर्ती असले, तरीही मध्यमवर्गीय जीवनाच्या ठराविक चाकोरीची ही कथा नाही. सामान्य माणसाच्या सामान्य जीवनातल्या 'असामान्य' सुखदु:खांना उद्गार देणारी ही कथा आहे. हलक्याफुलक्या, मिस्किल विनोदी शैलीचे अधिष्ठान 'वपुं'च्या कथांना असले तरीही त्यांची कथा कधी 'आचरट' होत नाही. त्यांच्या कथानिवेदनात एकप्रकारचा संयतपणा आहे. वाचकांना खुलवणा-या, हसवणा-या रंजकतेचे अधिष्ठान त्यांच्या कथेला असले तरीही हव्यास म्हणून त्यांची कथा 'स्वस्त रंजकते'ला थारा देत नाही. लेखक बहुश्रुत असल्यामुळे या कथाविश्वात विविधता व विपुलता आहे. अनुभवाचा तोचतोचपणा आढळत नाही. सामान्यत: पाच-पन्नास कथा लिहून झाल्या की मराठी लेखकांची 'कथा' थकते आणि लेखनाचा आपद्धर्म म्हणून अनुभवाचे तेच दळण आणि वळण गिरविले जाते आणि वाचकांच्या दृष्टीने त्यांची कथा रूक्ष, कंटाळवाणी होऊ लागते. 'वपुं'ची प्रत्येक कथा अजूनही ताजी व टवटीत घडते. त्यांची कथा या ना त्या प्रकारे सामान्यातल्या सामान्य वाचकांच्या मनोविश्वाला स्र्प करून जाते. त्या स्र्पाने वाचक अंतर्मुख व्हावा असे सामर्थ्य 'वपुं'च्या कथेत आहे.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923546566829,"sku":"1487","price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_20229275498482.jpg?v=1760757913"},{"product_id":"maza-mazyapashi","title":"Maza Mazyapashi ? | माझं माझ्यापाशी ?","description":"\u003cp\u003eव. पु. काळे एक वाचकप्रिय लेखक. त्यांच्या लेखनात वाचकांशी हितगुज करण्याची, बोलण्याची एक उर्मी आहे. ती उर्मीच वाचकांना खेचून घेते. वपुंच्या कथा या प्रत्येक मराठी माणसाच्या घराघरात घडणार्‍या कथा आहेत. या कथांच्या अनुषंगाने वपु जे भाष्य करतात ते महत्त्वाचं आहे. प्रत्येक कथेतून चिंतन करणारं, जीवनावर भाष्य करणारं एक जागतं मन वाचकांना भेटत असतं. छोट्या छोट्या प्रसंगातून वाचकाला विचारप्रवृत्त करण्याचं सामर्थ्य या कथांमध्ये आहे. या कथासंग्रहात एकूण चौदा कथा आहेत. ही प्रत्येक कथा मानवी मनाच्या अस्वस्थतेचे प्रतिबिंब आहे. माणसाच्या घुसमटलेल्या विचाराचे तरंग या कथातून व्यक्त होतात. रसिक वाचकांना मेजवानी ठरावी अशा चिंतनशील कथा.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923547222189,"sku":"1495","price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_2018423234344331.jpg?v=1760769194"},{"product_id":"moden-pan-vaknar-nahi","title":"Moden Pan Vaknar Nahi | मोडेन पण वाकणार नाही","description":"\u003cp\u003eजगाला विक्षिप्त वाटतील अशा स्वतःच्या एखाद्या मतप्रणालीच्या पूर्ततेसाठी,हट्टामुळे नामशेष होऊन जाणाऱ्या,पण माघार न घेणाऱ्या अशा विक्षिप्त व्यक्तींची एकेक तऱ्हा रंगविणाऱ्या आठ अशा खाशा कथांचा संग्रह ...मोडेन पण वाकणार नाही.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923547549869,"sku":"1499","price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_2019913232814126.jpg?v=1765225645"},{"product_id":"hubehub","title":"Hubehub | हुबेहूब","description":"\u003cp\u003eहुबेहूब नक्कल करणाया बबनचे वास्तविक आयुष्यही नकलेसारखेच झाले... पोटाची खळगी भरण्यासाठी स्वार्थी माणसाने देवालाही ‘घाम’ फोडायला लावला... स्वत:च्या जिवापेक्षाही मुक्या जनावरांवर जिवापाड प्रेम करणारा तात्या म्हातारा... ‘तगई’साठी पैसे खाणाया प्रत्येक माणसाला जन्मभराची अद्दल घडविणारा अण्णा भागवत... ‘जेवणवेळ’ झाली की, लिंबाखाली बसणाया आबामुळे कितीतरी चांगल्या आणि वाईट गोष्टी घडल्या... केस कोणती अन् कशीही असू दे; दिगुअण्णा ‘साक्षीदार’ असले की, निकाल लागलाच म्हणून समजा... मानवी स्वभावाच्या अशा नाना कळा... अनुभवा द.मांच्या खुमासदार शैलीत!\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923547648173,"sku":"1503","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_20229276436242.jpg?v=1765215539"},{"product_id":"sarmisal","title":"Sarmisal | सरमिसळ","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यात जसे एक मारुतीचे देऊळ असते, एक पार असतो, एक ओढा असतो, त्या मातीत पिकणारे खास पीक असते; तसा गावरान विनोदही असतो. गावओढ्यासारखाच तो सतत खळाळत असतो आणि हरेक पाण्याची चव वेगळी, तशी या विनोदाची चवही वेगळी असते, खास असते. भंपक माणसांनी मारलेल्या बढायांतून, अडाण्यांच्या आणि अश्रापांच्या सहज वागण्यातून, बेरकी लोकांच्या गप्पांतून, जुन्या माणसांच्या आठवणींतून, तरण्यांच्या हुंदडण्यातून विनोद उसळ्या घेत असतो. रोज हसावे असे काही घडत असते. उत्तम म्हणून गाजलेल्या मिरासदारांच्या कथांतून हा गावरान विनोद अगदी जसाच्या तसा आढळतो.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923547713709,"sku":"1504","price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_202283031644753.jpg?v=1760763942"},{"product_id":"gappagoshti","title":"Gappagoshti | गप्पागोष्टी","description":"\u003cp\u003eमानवी स्वभाव, त्यातली विसंगती, इरसालपणा आणि यांमधून होणारी विनोदनिर्मिती या विषयांभोवती या संग्रहातल्या कथा गुंफलेल्या आहेत. सहज व उस्फूर्त कथनशैलीमुळे यातल्या कथा या `गप्पागोष्टी`च वाटतात.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923547779245,"sku":"1505","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_20229276563212.jpg?v=1765205428"},{"product_id":"gammatgoshti","title":"Gammatgoshti | गंमतगोष्टी","description":"\u003cp\u003eखासबातमीचं भांडवल करणाया किसन न्हाव्याची तहा... पंचनाम्यात दुरुस्ती कशी करायची याचे प्रात्यक्षिक घेणारा नारायण कॉन्स्टेबल... दिल्लीला प्रदर्शन पाहण्यास निघालेल्या पाटलांनी घेतलेले विशेष ‘दर्शन’.... डिगूनानांच्या क्रियाकर्माला केवळ पैशांमुळे मिळालेला ‘वारस’....! नवशिक्षणशास्त्राचा प्रयोग बासनात गुंडाळून; पुन्हा ‘विद्या येई’चा पाठ गिरवणारे नवशिका शिक्षक... वधूसंशोधनाऐवजी ‘बुद्रुक’ का ‘खुर्द’ या फेऱ्यातच अडकलेला वर... अन् लगीन घरात सफाईने हात मारून सर्वांसमक्ष पोबारा करणारा ‘भामटा’.... ...या आणि अशाच इरसाल पात्रांचा आपल्या ग्रामीण शैलीतून मागोवा घेणाया द.मा. मिरासदारांच्या ‘गंमत गोष्टी’!\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923547844781,"sku":"1506","price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_2022927234717505.jpg?v=1765224707"},{"product_id":"bhokarwadichya-goshti","title":"Bhokarwadichya Goshti | भोकरवाडीच्या गोष्टी","description":"\u003cp\u003eविहिरीत रॉकेल सापडल्यावर ‘बॉम्बे हाय’ सारखी ‘भोकरवाडी हाय’ कंपनी स्थापन करून निवांत जगण्याचं स्वप्नं पाहणारा शिवा जमदाडे अन् त्याची कट्टा कंपनी. गुप्त धनाच्या शोधात कुलंगडी शोधणारा नाना चेंगट. साताठ कणसं, शेंदाडं अन् चरवीभर दूध यासारखं बरंच काही उपोषणाच्या आदल्या दिवशीच रिचवणारा बाबू पैलवान. खव्याचा गोळा विकून आलेल्या पैशातनं बायकोला सिनेमा दाखवायचं आमिष देणार्‍या बापूची झालेली तर्‍हा.. चावलेल्या कुत्र्याच्या पाळतीवर फिरणार्‍या नाना चेंगटाला त्या कुत्र्यानंच कसं बिंगवलं.. बावळेमास्तरांना तपकिरीचं व्यसन सोडण्याचा दम देणार्‍या हेडमास्तरांनी पुन्हा परवानगी कशी दिली.. भोकरवाडीतल्या अशा गावगन्ना, बेरकी, छत्री अन् इरसाल पात्रांच्या पोट धरधरून हसायला लावणार्‍या आणि द. मा. मिरासदारांच्या लेखणीतून उतरलेल्या खुसखुशीत कथा.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923547943085,"sku":"1507","price":266.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_2022635200637.jpg?v=1765225093"},{"product_id":"gudgulya","title":"Gudgulya | गुदगुल्या","description":"\u003cp\u003eकाही वर्षांपूर्वी मराठी लघुकथेला नवा बहर आला. जुनी चाकोरी सोडून धीट अशा काही नव्या वाटा पडल्या. या वाटांपैकी गावाकडील गोष्टी सांगणारी वाट सवघड. म्हणून त्या दिशेने वर्दळ वाढली. इतकी की बघता बघता पाऊलवाटेचा गाडीरस्ता झाला, अनेक चाकोया उमटल्या, फुपोटा उडू लागला, अनेक ग्रामीण कथा लिहिल्या गेल्या. ग्रामीणकथेच्या निशाणाखाली आज पुष्कळ शिलेदारांची गर्दी झालेली आढळते. पण मिरासदारांनी पाडलेली वाट अजून पाऊलवाटच आहे. तिच्यावर गर्दी उसळलेली नाही. कारण ती वाट सवघड नाही. उत्तम म्हणून गाजलेल्या मिरासदारांच्या कथांतून गावरान विनोद अगदी जसाच्या तसा आढळतो.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923548008621,"sku":"1508","price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_20229277627601.jpg?v=1760775368"},{"product_id":"chutkyachya-goshti","title":"Chutkyachya Goshti | चुटक्याच्या गोष्टी","description":"\u003cp\u003eद. मां. च्या चुटक्याच्या गोष्टी मधून मानवी स्वभावाचे विविध पैलू आपल्या समोर येतात. त्यातील काही आपल्याला अंतर्मुख करतात... तर काही हसवतात...!\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923548106925,"sku":"1509","price":198.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_2022927730987.jpg?v=1765212323"},{"product_id":"hasanaval","title":"Hasanaval | हसणावळ","description":"\u003cp\u003eगावाकडील  गोष्टी  सांगणारी  वाट  सवघड. वर्तुळाच्या मध्यबिंदूपासून जेवढ्या त्रिज्या निघतात तेवढ्या वाटा असू शकतात,हे एका मिरासदारांनी ओळखले आणि स्वत:चीच अशी एक वाट पाडली. हरभर्‍याची आंब, रात्री कोवळ्या पिकावर फडके पसरून सकाळी धरता येते पण पाणी दिलेल्या, कणसं, लोंब्या धरलेल्या उभ्या पिकांचा वास धरणे कठीण. मिरासदारांची शहामत अशी की, त्यांनी हा विनोद धरला आणि तोसुध्दा त्याच्या खास चवीसकट! उत्तम म्हणून गाजलेल्या मिरासदारांच्या कथांतून हा गावरान विनोद अगदी जसाच्या तसा आढळतो.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923548205229,"sku":"1510","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_202292762013196.jpg?v=1765207485"},{"product_id":"makadmeva-d-m-mirasdar","title":"Makadmeva |D. M. Mirasdar) | माकडमेवा |द. मा. मिरासदार)","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यात जसे एक मारुतीचे देऊळ असते, एक पार असतो, एक ओढा असतो, त्या मातीत पिकणारे खास पीक असते तसा गावरान विनोदही असतो. गाव ओढ्यासारखाच तो सतत खळाळत असतो आणि हरेक पाण्याची चव, तशी या विनोदाची चवही वेगळी असते, खास असते. भंपक माणसांनी मारलेल्या बढायांतून, अडाण्यांच्या आणि अस्त्रापांच्या सहज वागण्यातून, बेरकी लोकांच्या गप्पांतून, जुन्या माणसांच्या आठवणीतून, तरण्यांच्या हुंदडण्यातून विनोद उसळ्या घेत असतो. रोज हसावे असे काही घडत असते. हरबयाची आंब, रात्री कोवळ्या पिकावर फडके पसरून सकाळी धरता येते, पण पाणी दिलेल्या, कणसं, लोंब्या धरलेल्या उभ्या पिकांचा वास धरणे कठीण. मिरासदारांची शहाम्मत अशी की त्यांनी हा विनोद धरला आणि तोसुद्धा त्याच्या खास चवीसकट.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923548270765,"sku":"1511","price":216.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_202292765251911.jpg?v=1765220306"},{"product_id":"umbaratha","title":"Umbaratha | उंबरठा","description":"","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923548762285,"sku":"1533","price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_2022111255846814.jpg?v=1760742224"},{"product_id":"vata","title":"Vata | वाटा","description":"","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923548827821,"sku":"1534","price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_2022111241058872.jpg?v=1760723288"},{"product_id":"sarva","title":"Sarva | सरवा","description":"","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923548893357,"sku":"1535","price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_202211142524589.jpg?v=1760765078"},{"product_id":"chitre-ani-charitre","title":"Chitre Ani Charitre | चित्रे आणि चरित्रे","description":"","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923548991661,"sku":"1536","price":198.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_20184265316821.jpg?v=1765221998"},{"product_id":"ek-ekar","title":"Ek Ekar | एक एकर","description":"","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923549089965,"sku":"1537","price":126.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_202211142218944.jpg?v=1760735011"},{"product_id":"goshti-gharakadil","title":"Goshti Gharakadil | गोष्टी घराकडील","description":"","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923549155501,"sku":"1538","price":117.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_20184265384212.jpg?v=1760763558"},{"product_id":"mandeshi-manasa","title":"Mandeshi Manasa | माणदेशी माणसं","description":"","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923549286573,"sku":"1539","price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_202266530488.jpg?v=1760753211"},{"product_id":"khekada","title":"Khekada | खेकडा","description":"\u003cp\u003eरत्नाकर मतकरी हे गुढकथाकार म्हणून ओळखले जातात. खेकडा या कथासंग्रहातील बहुतेक सर्वच कथांमधून जे भय दाटून राहिलेले आहे, ते वाचकाला कडकडून दंश करणारे आणि जिव्हारी झोंबणारे आहे़ या भयात वाचकाचे अवघे मनोव्यापार झपाटून टाकण्याची शक्ती आहे. निरनिराळ्या १० गुढकथा यात समाविष्ट आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923551088813,"sku":"1554","price":207.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_20226131415253.jpg?v=1765206781"},{"product_id":"virangula","title":"Virangula | विरंगुळा","description":"\u003cp\u003eधकाधकीच्या आयुष्यात ‘विरंगुळा’ शोधणारे तात्या.... ओढग्रस्त परिस्थितीत विठोबाला दिलासा देणारा ‘पाऊस’.... आयुष्याच्या शेवटापर्यंत भिकुची पाठ न सोडणारे त्याचे ‘भोग’.... लग्नात आडकाठी आणणारा बुधाच्या आयुष्यातील ‘धोंड्याचा महिना’.... औषधांचा खुराक खाण्यासाठी मधूचा ‘आजारी पडण्याचा प्रयोग’.... एका दिवसाच्या भाकरीचा प्रश्न सोडवणारं ‘गवत’.... अशा प्रतिकूल परिस्थितीतही आयुष्यातील आनंद शोधणारी सामान्यातील असामान्य माणसं! द. मा. मिरासदारांनी आपल्या खासशैलीत रेखाटली आहेत. ती आपल्याला ‘विरंगुळ्या’चा क्षण देऊन जातात.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923551187117,"sku":"1555","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_202292762458796.jpg?v=1760749851"},{"product_id":"bhutacha-janma","title":"Bhutacha Janma | भुताचा जन्म","description":"\u003cp\u003eगावाकडील कथा, त्या कथा लिखाणाची शैली आणि त्यातील अस्सल ग्रामीण बोली याचं रसायन म्हणजे हा ११ कथांचा कथासंग्रह.... खेडेगावातील निरनिराळ्या व्यक्ती आणि त्यांच्या वागण्यातील गमती जमती आपल्याला या ११ कथांमध्ये अनुभवायला मिळतात.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923551252653,"sku":"1556","price":171.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_202292762243293.jpg?v=1760761933"},{"product_id":"gappangan","title":"Gappangan | गप्पांगण","description":"\u003cp\u003eगुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार वरचा माणूस खाली येतो; पण खालचा मनुष्य एकदम वर जातो, तो फक्त – सिनेमातच! गागाभट्टांनाही अवकाशात पाठवण्याचे सामथ्र्य एकाच व्यक्तीत असू शकते, तो म्हणजे – ‘मंत्री’! श्रोते नसले तरी वक्ता हा असतोच; अशी एकच सभा असते – निवडणुकीची! रम्य बालपणात ही विलक्षण सृष्टी आपण पाहत बसतो. नव्हे, त्याच जगात आपण जगत असतो, ती दुनिया असते – भुतांची! जुन्या कादंबरीत आढळणाया या देवीची आराधना आपल्या प्रत्येकालाच करावी लागते, ती म्हणजे – निद्रादेवीची! शहाण्या माणसाने ही पायरी कधी चढू नये असे म्हणतात; ती म्हणजे – कोर्टाची! या कलेचे एक शास्त्र असते, नियम असतात, ती कला म्हणजे – लाच देणे! हे सर्वश्रुत अनुभव; लेखांच्या माध्यमातून द. मा. मिरासदारांनी वाचकांसमोर मांडले आहेत. वाचकांशी साधलेला हा संवाद; हेच या ‘गप्पांगण’चे विशेष आहे.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":44923551350957,"sku":"1557","price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_202292763651796.jpg?v=1760772877"},{"product_id":"aghal-paghal","title":"Aghal Paghal | अघळ पघळ","description":"\u003cp\u003eखळाळून हसत दिवस प्रसन्न करणाऱ्या १२ लेखांचा हा संग्रह आहे. अर्थातच पु. लं. देशपांडे यांच्या खास शैलीत शाब्दिक आणि प्रसंगनिष्ठ विनोदाचे भांडार त्यातून खुले होते. या विनोदाला दृश्यात्मकता असल्याने प्रसंग जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे राहण्याची किमया या लेखांनी साधली आहे. या लेखांची शिर्षकही आगळीवेगळी.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Mauj Prakashan Griha \/ Marathi","offer_id":44923552006317,"sku":"1564","price":288.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/File_20191118233827880.jpg?v=1765210334"}],"url":"https:\/\/www.grantham.in\/collections\/stories.oembed?page=67","provider":"Grantham","version":"1.0","type":"link"}