A - Amitabhcha | अ - अमिताभचा

A - Amitabhcha | अ - अमिताभचा
१९७३ साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली, आणि आता निवृत्तीला आले, तर हाच अदभुत माणूस आम्हाला पिंक ह्या महिलाप्रधान सिनेमात ना का मतलब सिर्फ ना होता है, अस ठणकावतो, बदला ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे सब का सच अलग अलग होता है, अस तत्त्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या झुंड मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला झुंड नही, टीम म्हणायची शिकवण देतो, तेव्हा आजही त्याच म्हणण आमच्या हृदयात थेट उतरत. आता पन्नाशीत असलेल्या आमच्या पिढीच्या मनोविश्वातून अमिताभ बच्चन वजा करण अशक्य आहे. दैनंदिन जीवनात अमिताभच्या सिनेमातील संवादांचे संदर्भ अखिल भारतात आपसूकच आमच्या पिढीच्या तोंडून बाहेर पडत असतात. म्हणूनच आमच्या पिढीसाठी अ हा अमिताभचाच आहे.