A Million Broken Windows | अ मिलियन ब्रोकन विंडोज

A Million Broken Windows | अ मिलियन ब्रोकन विंडोज
क्रिकेट या खेळाचे एका अर्थाने भारतातील जन्मस्थान असणार्या मुंबईने, संपूर्ण देशाच्या असलेल्या आणि देशभरात खेळल्या जाणार्या या खेळावर सततच कसे अधिराज्य गाजवले आहे याचीच 'अ मिलियन ब्रोकन विंडोज' ही चित्तवेधक कहाणी.रंजक किस्से आणि विश्लेषणाने परिपूर्ण अशा या पुस्तकात; विविध लीग, स्पर्धां, खेळाडू आणि चाहते यांच्याशी निगडीत चर्चेतून केवळ क्रिकेट या खेळाचेच नाही, तर खुद्द मुंबई शहराचे देखील शब्दचित्र उभे केले आहे. मकरंद वायंगणकर या पुस्तकातून आपल्या वाचकांची मैदानावरचे वातावरण आणि क्रिकेटची गोष्ट यांच्याशी ओळख करून देतात. एकमेवाद्वितीय असणार्या मुंबई आणि क्रिकेट यांच्या नात्याचे साक्षीदार असणारे हे पुस्तक या नात्यास मानाचा मुजरा आहे.