Aai Hotana | आई होताना

Aai Hotana | आई होताना
अपत्याचा जन्म ही मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाची घटना आहे. या घटनेवर मानवाचे सर्व आयुष्य अवलंबून असते. या घटनेची तयारी खूप आधीपासून केली तरच मानवी जीवन निरामय, यशस्वी, दीर्घायुषी होईल. बालकाच्या जन्माची निसर्गात तयारी कोट्यवधी उत्क्रान्तीत होत आलेली असतेच. शिवाय मातेची व पित्याची सुदृढता हा आपल्या प्रयत्नांचा महत्त्वाचा भाग झाला. याची तयारी दोघांच्या जन्मापासूनच घ्यावी लागते. किमान पौगंडावस्थेपासून गृहस्थाश्रमात प्रवेश करते वेळेपर्यंत घेण्याला पर्यायच नसतो. स्त्री-बीज-फलन होऊन, गर्भधारक होऊन, गर्भारपण सुस्थितीत जाऊन सुखरूप बाळंतपण होणे हे तर फारच महत्त्वाचे असते. जन्मल्यापासून आपापली काळजी घेण्याची पात्रता येईपर्यंत मुलाची वाढ आणि विकास यावर बारकाईने लक्ष ठेवणे जरूरीचे आहे. नंतरही संस्कार आणि शिक्षण, शारीरिक सुदृढता आणि मनोबौद्धिक प्रगल्भता इकडे लक्ष द्यावेच लागते. हे सारे करतांना आई-वडिल, सर्व कुटुंबीय यांचा नेमका भाग कोणता हे प्रत्येकाला समजणे आवश्यक आहे. ‘‘आई होताना.....’’ या पुस्तकात या आणि यासारख्या महत्त्वाच्या मुद्यांचा सखोल परामर्श घेतलेला आहे. प्रत्येक विवाहेच्छू स्त्री पुरुषाने हे पुस्तक वाचले पाहिजे. मूल होण्याचा निर्णय घेताना या पुस्तकाचा अभ्यास केलाच पाहिजे. #NAME?