Aaichi Denagi | आईची देणगी

Aaichi Denagi | आईची देणगी
आजची नवी पिढी बुध्दिमान आहे. जिज्ञासू आहे. विविध माध्यमांमधून त्यांना माहितीचे प्रचंड साठे उपलब्ध होत असतात. विज्ञान, तंत्रज्ञान हा त्यांच्या जीवनाचा अभिन्न भाग आहे. पण माणूस म्हणूनही ती उत्तम घडायला हवीत. गुणसंपन्न व्हायला हवीत. सहृदय व्हायला हवीत. त्यांना कर्तव्यांची जाणीव असायला हवी. ह्या ‘माणूसपणा’साठी त्यांच्यावर चांगले संस्कार व्हायला हवेत. प्रख्यात लेखक गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर ह्यांनी ‘आईची देणगी’ मध्ये सुबोध आणि रसाळ कथांच्या माध्यमातून हे काम फार प्रभावीपणे केले आहे. आपल्या भारतातील आदर्श व्यक्तींच्या, त्यांच्या सद्गुणांच्या कथा गोनीदांनी अतिशय वेधक रीतीने मुलांच्या मनाशी संवाद साधत सांगितल्या आहेत. बालकुमारांसाठी हा सुंदर, संस्कारसंपन्न कथांचा एक खजिनाच आहे!