Aaji Aai Te Bai | आजी आई ते बाई
Aaji Aai Te Bai | आजी आई ते बाई
उषा पुरोहित या पाककृती पुस्तकांच्या सुप्रसिद्ध लेखिका आणि भारतीय हवाईदलातल्या उच्चपदस्थ ओव्हीएम पी.एल. पुरोहित (निवृत्त) यांच्या पत्नी. त्यामुळे समाजात वावरही पुष्कळ. त्यातून विविध स्तरांतल्या, विविध प्रांतातल्या, विविध व्यक्तिमत्त्वांच्या अनेक स्त्रिया त्यांच्या संपर्कात आल्या. स्त्रियांमध्ये दिसून येणारे आणि सुप्तावस्थेतले गुण याविषयी त्यांना नेहमीच अप्रूप वाटलं आहे. त्याच अनुपातून त्यांनी या पुस्तकात अनेक स्त्रियांविषयीच्या आठवणी लिहिल्या आहेत. काही उद्बोधक प्रसंगही सांगितले आहेत, तर काही कटू अनुभव कथन केले आहेत. त्याचबरोबर त्यावर आपलं भाष्यही नोंदवलं आहे. म्हणूनच हे पुस्तक सर्वसमावेशक असं ठरतं.
पुस्तकात त्यांच्या आजी, आईपासून घरातल्या मदतनीस बायकांपर्यंत अनेक स्त्रिया समाविष्ट आहेत. या स्त्रियांविषयीचं ‘कॅलिडोस्कोपिक’ चित्रण करणारं पुस्तक… आजी, आई ते बाई….