Abhinay Chintan |अभिनय चिंतन

Abhinay Chintan |अभिनय चिंतन
अभिनयाचा विचार ज्या नाटकाच्या भाष्यकारांनी आजवर केला आणि ज्यांच्या अभिनय चिंतनामुळे अभिनयाचे व्याकरण बदलले असे जागतिक स्तरावरील अभिनयाचे भाष्यकार म्हणजे, भारतीय नाट्यशास्त्राचे रचनाकार भरतमुनी, आधुनिक काळातील वास्तववादी अभिनयाचे बायबल लिहिणारे रशियन अभिनेता आणि दिग्दर्शक स्तानिस्लावस्की, हिंस्त्र रंगभूमीची कल्पना मांडणारे फ्रांसचे भाष्यकार ऑर्तो, रंगभूमीवर पवित्र नटाची संकल्पना मांडणारे पोलंड येथील दिग्दर्शक ग्रोटोवस्की आणि नाटक हे माणसाला कृतिशील बिनविणारे माध्यम आहे असे मानणारे जर्मनीचे नाटककार आणि दिग्दर्शक ब्रेख्त! या पाच भाष्यकारांनी खऱ्या अर्थाने रंगभूमीवरील अभिनयाचे मूलभूत चिंतन केले अशी या शोध ग्रंथाची परिकल्पना आहे.