Abhinaysamat Dilipkumar Charitra Ani Chitrapat | अभिनयसम्राट दिलीपकुमार चरित्र आणि चित्रपट

Abhinaysamat Dilipkumar Charitra Ani Chitrapat | अभिनयसम्राट दिलीपकुमार चरित्र आणि चित्रपट
लेखक बेंडखळे यांनी एकूण १४ प्रकरणांतून दिलीप कुमार यांच्या चरित्राचा आणि त्याच्या चित्रपटांचा संक्षेपात, परंतु पूर्णत्वाने आढावा घेतला आहे. यापैकी काही प्रकरणांतून त्यांच्या आयुष्यातील वेधक प्रसंग आणि इतर प्रकरणांतून विविध चित्रपटांत त्यांनी साकारलेल्या भूमिका, त्या चित्रपटाचे कथानक, त्यातील इतर अभिनेते व अभिनेत्री यांची नावे, चित्रपटाच्या निर्मितीची कहाणी, त्यातील गीते, संगीत आणि इतरही बरीच महत्त्वपूर्ण पैलू यांची माहिती अतिशय रंजकतेने दिली आहे. या पुस्तकाची तीन प्रकरणे दिलीप कुमार यांची प्रेमप्रकरणे, त्यांचे विवाह आणि विवाहानंतरचे चित्रपट या विषयांना वाहिलेली आहेत. लेखकाच्या या लेखनप्रपंचामुळे हे पुस्तक केवळ एक सामान्य पुस्तक न राहता दिलीप कुमार यांच्या कारकिर्दीतल्या हिंदी चित्रपटसृष्टीचा संदर्भमूल्य असलेला एक आगळावेगळा चित्रपटकोश झाले आहे.