Adbandarcha Rudrakot | आडबंदरचा रुद्रकोट

Adbandarcha Rudrakot | आडबंदरचा रुद्रकोट
अमेरिकेत जन्मलेली, शिकलेली, वाढलेली, नुकतीच आर्किऑलॉजिस्ट झालेली एक मराठी मुलगी कोकणातील आजोळच्या ओढीने येते. मात्र इथेच रमते. तरीही स्वत:च्या प्रयत्नातून काहीतरी संशोधन करून दाखवायचे या इर्षेने आसपासच्या प्रदेशात शोध घ्यायला लागते.तिला ना ऐतिहासिक मराठी भाषेचे ज्ञान, ना मोडी लिपीशी ओळख. तरीही कोणत्याही ऐतिहासिक अस्सल कागदपत्रांच्या मदतीविना, जे जे हाती लागेल ते स्वीकारून योग्य संधी शोधायला लागते आणि अनपेक्षित असे यश तिच्या पदरात पडते.अस्सल कागदपत्रांविनाही इतिहास संशोधन होऊ शकते या शक्यतेचा विचार करायला लावणारी ही एक कहाणी लिहिली आहे डॉ. अविनाश सोवनी यांनी.