Adgar | आडगार
Adgar | आडगार
आडगार ही महादेव मोरे यांची ग्रामीण जीवनावरील कादंबरी. आन्शीचं उधळलेलं जीवन या कादंबरीतून दिसतं. व्यसनी पिता, कमालीचे दारिद्र्य, आईचे तंबाखू वखारीतले काबाड कष्ट. यांतून आन्शीचं तारुण्य, शिक्षण यांची वाताहत होते. बापू नावाच्या किराणा दुकानदाराशी तिचं प्रेम जमतं. बापू लग्न होऊनही गावातल्या मुलींना फसवत असतो, त्यांत आन्शीसुद्धा फसते. आन्शीचं लग्न होतं; पण ती नांदत नाही. गावातली भागामावशी तिला अजूनच बिघडवते. गावचा पुजारी व मावशी तिला पैशांचं आमिष दाखवून मुंबईला कुंटणखान्यात विकतात. आन्शीची ही जीवननौका अशीच भरकटत राहते की येते योग्य मार्गावर?