Adital | आदिताल

Adital | आदिताल
काव्यात्मक अनुभव गद्यातही विशेषत: कथेत अवतरू शकतो. 'आदिताल' मध्ये अर्ध जाणिवेच्या (सब कॉन्शस) पातळीवरील काव्यात्म अनुभव अवतरले आहेत. ते व्यक्त करण्याचा प्रयत्न या कथांतून दिसेल.दुसरे असे की कथालेखन आणि त्या लेखनाचा अनुभव ही साहित्यिकाच्या जीवनात महत्त्वाची पण सामान्यांच्या तुलनेत अनोखी घटना असते. या घटनेच्या निमित्ताने येणारे अतिशय तरल आणि वेगवान, उत्कट, काव्यात्म अनुभवांचा कलात्म आविष्कार करण्याची धडपड या कथांतून जाणवेल. सर्वच साहित्यिकांना ते अनुभव येतात असे नाही, पण अति-संवेदनशील जाणकार साहित्यिकाला ते येऊ शकतात.हे साहित्य सृष्टीला फारसे परिचित नसलेले अनोखे, अर्धसुप्त अनुभव 'आदिताल' मधील कथा व्यक्त करतात. मराठी साहित्य-सृष्टीला हे अनुभव नवे वाटावेत, असे आहेत.