Adnyat Gandhi | अज्ञात गांधी

Adnyat Gandhi | अज्ञात गांधी
अज्ञात गांधी अचंबित करणाऱ्या बापूकथा महात्मा गांधी माहीत नाहीट असा माणूस आपल्या देशात सापडणं विरळा. पण आपल्यासारखाच सामान्य माणूस ‘महात्मा’ कसा बनू शकतो, याचं कोडं आपल्याला उलगडलेलं नाही. या अर्थाने गांधीजी अज्ञातच राहिले आहेत. गांधीजींना ज्यांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं, सहवातून अनुभवलं अशा भाग्यवंतांपैकी नारायणभाई देसाई हे एक. गांधीजीचे पुत्रवत स्वीय सचिव महादेवभाई देसाई यांचे सुपुत्र. गांधीजींच्या अंगाखांद्यावर खेळलेले आणि दांडीयात्रा, चलेजाव चळवळ वगैरे ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार. गांधीचरित्रांचे ख्यातनाम कथाकथनकार. गांधीजींच्या आयुष्यातील अनेक अज्ञात गोष्टी उकलून दाखवणारं त्यांचं हे पुस्तक. भरताचा इतिहास आणि आजचं वर्तमान यांवरही नव्याने प्रकाश टाकणारं.अचंबित करणाऱ्या बापू कथा.