Aharavishayi Sare Kahi... | आहाराविषयी सारे काही..

Aharavishayi Sare Kahi... | आहाराविषयी सारे काही..
ज्येष्ठ आहारतज्ज्ञ वसुमती धुरू यांनी या पुस्तकात पाककला व आहारशास्त्र यांचा सुयोग्य मेळ साधला आहे. सर्व प्रकारच्या विविध पाककृती पध्दतशीरपणे देऊन त्या खाली त्या पदार्थाच्या प्रत्येक वाटपातून प्रत्येकाला किती प्रमाणात प्रथिनं, खनिजं, जीवनसत्त्वं, तंतू, कॅलरीज इ. पोषणमूल्यं लाभतील याचा 'रेडीमेड' तक्ताच दिला आहे. तसेच हा पदार्थ कोणत्या आजारासाठी वा व्याधीसाठी पथ्यकारक ठरेल वा कुपथ्यकारक ठरेल, कुणी तो आवर्जून खावा, कुणी तो कमी प्रमाणात खावा, कुणी तो वर्ज्य करावा याचीही माहिती तिथल्यातिथेच दिली आहे. या पुस्तकाची हीच वैशिष्टये आहेत, म्हणूनच हे पुस्तक इतर पाककृती व आहारशास्त्रावरील पुस्तकांपेक्षा संपूर्णपणे आगळंवेगळं ठरावं. थोडक्यात, गृहिणींना पाककलेसोबतच आहारशास्त्रावरही सहजपणे पकड घेण्यास समर्थ करणारं व भान देणारं पुस्तक आहाराविषयी सारे काही...