Aisa Dnyansagaru : Bakhar Mumbai Vidyapirhachi | ऐसा ज्ञानसागरु : बखर मुंबई विद्यापीठाची

Aisa Dnyansagaru : Bakhar Mumbai Vidyapirhachi | ऐसा ज्ञानसागरु : बखर मुंबई विद्यापीठाची
दीडशे वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली . मुंबईत झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे मुंबई विद्यापीठाची आणि शहराची समांतरच वाढ झाली . ती नेमकी कशी झाली , त्यामुळे समाजाचे प्रबोधन होऊन मुंबईने देशस्तरावर सगळ्याच क्षेत्रांत नेतृत्व कसे मिळवले याचे कथन करणारा हा रोमहर्षक इतिहास . १९ व्या शतकातील शैक्षणिक आणि अन्य घडामोडी आपल्यासमोर घडत आहेत असा आभास हा ग्रंथ वाचताना वाचकाला होईल इतकी वाचकाला गुंतवून ठेवण्याची क्षमता यामध्ये आहे. विद्यापीठ आणि ब्रिटीश सरकार यांचा संघर्ष पाचवीला पुजलेलाच होता. परंतु अनेक आदरणीय व्यक्ती तेव्हा सरकारला पुरून उरल्या. त्यांची शब्दचित्रे या ग्रंथाद्वारे वाचकांच्या मनावर कायमची कोरली जातील. विद्यापीठातील घटनांचा समाजातील घटनांशी मेळ लावल्यामुळे आत्मचरित्रे -चरित्रे, आठवणी, किस्से यांचा माफक उपयोग केल्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या या इतिहासाला नवे परिमाण लाभले आहे.