Aisa Dustar Sansar | ऐसा दुस्तर संसार
Aisa Dustar Sansar | ऐसा दुस्तर संसार
विविध प्रयोगशीलतेतून आणि तंत्रशैलीच्या विविध प्रकटीकरणातून अंतिमत: लेखक भारत सासणे माणसाचा शोध घेत आलेले आहेत . माणूस आदिम अटळपणे जीवनाच्या प्रवाहात ताठ उभा राहतो आणि भोवतालच्या परिस्थितीतून जगण्याचे विविध मार्ग शोधतो, ही विलक्षण रहस्यमयता लक्षात येते तेव्हा या संग्रहातल्या काही कथांप्रमाणे, माणसांचा जीवनविषयक झगडा मांडावा लागतो. माणसे कधी गुमनामीच्या अंधेऱ्यामध्ये जगताना दिसतात तर कधी स्वत:च्या मानसकोषामध्ये गुंतताना दिसतात. अशाच विविध विषयांबाबत आणि विविध स्तरांतील माणसांच्या झगड्याबाबतच्या काही दीर्घकथा या संग्रहात समाविष्ट केल्या आहेत.