Ajinkya Yoddha Bajirao | अजिंक्य योध्दा बाजीराव

Ajinkya Yoddha Bajirao | अजिंक्य योध्दा बाजीराव
जगातील मोजक्या युद्धसेनानींमध्ये ज्या सेनापतीचा अर्थात पहिल्या बाजीरावाचा उल्लेख होतो त्या बाजीरावाचे गुण ठळकपणे मांडणारे हे पुस्तक. कोणत्याही लालित्यपूर्ण शब्दांचा वापर न करता लेखक जयराज साळगावकर यांनी या पुस्तकात बाजीरावाचे युद्धनेतृत्व किती उच्च दर्जाचे होते याची माहिती दिली. रात्री या झोपण्यासाठी नसतात, तर त्या शत्रूवर आक्रमण करण्यासाठी असतात, असे सांगणारा बाजीराव शत्रूला आपल्या नेमक्या टप्प्यात आणून नेस्तनाबूत करत असे. बाजीरावने जर कधी माघार घेतलेली असेल, तर तो त्याच्या युद्धनीतीचा भाग असे व शत्रूला हुलकावणी देऊन त्याला आपल्याला हव्या त्या ठिकणी युद्धास आणण्यासाठी रचलेला तो सापळा असे. बाजीरावाने छत्रपती शिवाजी महाराजांचे गनिमी काव्याचे युद्धतंत्र विकसित करून त्याचा आपल्या लढायांमध्ये वापर केला. याच पुस्तकात असलेल्या विविध परिशिष्टामधून महत्त्वाची माहिती वाचायला मिळते.बाजीरावाचे नाव घेतले, की पटकन मस्तानीचे नाव घेतले जाते; पण बाजीरावाचे आयुष्य त्यापेक्षा अन्य कारणांसाठी लक्षात ठेवणे आवश्यक आहे तेवढे त्याचे कर्तृत्व होते. लेखकाने त्याच्या याच गुणावर लक्ष केंद्रीत केले आहे.