Ajit Doval : Guptaher Te Rashtriya Suraksha Sallagar Eka Guptaherachi Chittathararak Kahani | अजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एका गुप्तहेराची चित्तथरारक कहाणी

Ajit Doval : Guptaher Te Rashtriya Suraksha Sallagar Eka Guptaherachi Chittathararak Kahani | अजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एका गुप्तहेराची चित्तथरारक कहाणी
बचावात्मक आक्रमण म्हणजेच दहशतवाद्यांचा उगम जेथे होतो,तेथेच त्यांना नेस्तनाबूत करायला हवे, असा सिद्धांत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मांडला होता. ऊरी हल्ल्यानंतर केलेला सर्जिकल स्ट्राइक असो, की पुलवामा हल्ल्याला भारताने दिलेले उत्तर,हे डोवाल यांच्या सिद्धांताचे यश दिसते.डोवाल यांनी पाकिस्तानमध्ये तब्बल सात वर्षे गुप्तहेर म्हणून काम केले होते. मिझोराममध्ये मिझो बंडखोरांमध्येच फूट पडली होती. सुवर्णमंदिरावर झालेल्या ऑपरेशन ब्लॅक थंडरच्या वेळी थेट खलिस्तानवादी दहशदवाद्यांमध्ये आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचा एजंट म्हणून ते राहिले होते. यामुळेच रक्ताचा एकही थेंब न सांडता सुरक्षा दलांना ही कारवाई पूर्ण करता आली. चीनबरोबरच्या डोकलाम वादात त्यांच्या मुत्सद्देगिरीचा कस लागला. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या मुत्सद्देगिरीच्या प्रवासात अजित डोवाल यांनी देशासाठी बजावलेल्या गौरवास्पद कामगिरीचा आढावा या पुस्तकात घेतला आहे.