Aksharnishthanchi Mandiyali : Granth Shodh Ani Vachan Bodh | अक्षरनिष्ठांची मांदियाळी : ग्रंथ शोध आणि वाचन बोध

Aksharnishthanchi Mandiyali : Granth Shodh Ani Vachan Bodh | अक्षरनिष्ठांची मांदियाळी : ग्रंथ शोध आणि वाचन बोध
या पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या ‘ग्रंथ-शोध’ या भागात टिकेकरांनी आपल्या 25-30 वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रभर आणि अहमदाबाद, दिल्ली, गुरगाव असा शहरांमध्ये घेतलेल्या ग्रंथांच्या शोधांची रसाळ हकिगत सांगितली आहे.ग्रंथ-शोधाचा प्रवास सांगताना मुंबईत दुर्मीळ पुस्तकं मिळणा-या ठिकाणांची सफर घडवली आहे, तशी रद्दीच्या ढिगा-यात तासन्तास घालवल्यानंतर मिळालेल्या मौलिक ग्रंथांच्याही कहाण्या सांगितल्या आहेत. महाराष्ट्राबाहेरच्या उत्तम ग्रंथ मिळणाऱ्या अड्डय़ांचाही ठावठिकाणा सांगून टाकला आहे! समानधर्मा ग्रंथ-सोबत्यांविषयीही लिहिले आहे, तसेच थोडय़ाशा उशिरामुळे गेलेल्या ग्रंथांविषयीची रुखरुखही नोंदवली आहे.पुस्तकाच्या ‘वाचन-बोध’ या दुस-या भागात, ‘वाचन’ या विषयावर दिलेले व्याख्यान आहे. यात टिकेकरांनी त्यांना ज्या ग्रंथांनी वाचनानंद दिला, जगाच्या अज्ञाताची गुपिते समजावून दिली, थोडक्यात ज्यांनी त्यांना प्रभावित केले, त्या ग्रंथांविषयी लिहिले आहे. यासोबत वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी काय करायला हवे, तिचे फायदे काय, याचाही थोडक्यात ऊहापोह केला आहे. ग्रंथ-मार्गदर्शकाची गरज का असते, तो नसला तर काय होते, असला तर काय होते याविषयी सांगत स्वत:च्या वाचनप्रवासाचा चढता आलेख सांगितला आहे.