Albel |आलबेल

Albel |आलबेल
सई परांजपे या सिद्धहस्त लेखिका-दिग्दर्शिकेचं 'आलबेल' हे एक नाटक आहे. दिल्लीला त्यांचं वास्तव्य असताना 'नो एक्झिट' हे जां पॉल सार्त्र यांचं सुप्रसिद्ध नाटक त्यांनी बसवायला घेतलं होतं. तीन मृतात्मे नरकात जातात आणि तिथे पोचल्यानंतर नरकवास म्हणून त्या तिघांना एकाच खोलीत डांबून ठेवलं जातं, असं त्या नाटकाचं विलक्षण कथाबीज होतं. ते नाटक काही कारणाने रंगमंचावर सादर होऊ शकलं नाही. परंतु हे बीज त्यांच्या डोक्यात रुजलं. तुरुंगातील कैद्यांची पार्श्वभूमी, स्वभाव, संस्कार, विचार सारंच एकमेकांपासून वेगळं असूनही ते एकमेकांसोबतच दिवस ढकलत असतात. याच बीजाचं रूपांतर म्हणजे आलबेल. नाटकाचं नावही वैशिष्ट्यपूर्ण आहे. तुरुंगात गस्त घालत असलेले हवालदार आ.स.स्लबे.स.स्ल अशी आरोळी ठोकत असतात. वास्तविक पाहता, या कैद्यांच्या आयुष्यात काहीच आलबेल नसतं. हा विरोधाभास नाटकाच्या नावातून ठळकपणे पुढे येतो. आलबेलच्या कोठडीत नियतीने एकत्र आणलेले तिघं आहेत - प्रौढ शिक्षक बाप्पा, मध्यमवयीन सदा आणि अट्टल खुनी भैरव. त्यांनी एकमेकांचा अपरिहार्य स्वीकार केल्यानंतर काय घडतं, यासाठी नाटक वाचणं किंवा पाहणंच उचित.