Alfred Rassel Wales | आल्फ्रेड रसेल वॅलेस

Alfred Rassel Wales | आल्फ्रेड रसेल वॅलेस
झुंजार वृत्तीचे वॅलेस कळकळीचे समाजसुधारक होते. डार्विन यांचा उत्क्रांतिवाद मानवनिर्मितीपर्यंत थांबतो; तेव्हा वॅलेस यांनी उत्क्रांतीची प्रक्रिया यापुढेही सुरू राहील; मात्र ती मानसिक असेल, असा पूरक सिद्धान्त मांडला. अशा या सामाजिक बांधिलकीचे पूर्ण भान ठेवून आयुष्यभर वावरणाऱ्या चतुरस्र शास्त्रज्ञाचे इ.स. १९१३ मध्ये निधन झाले. अखिल विश्वाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आल्फ्रेड वॅलेस यांच्या सारखे शास्त्रज्ञ निर्माण व्हायला हवेत. वॅलेस यांच्यावर मराठीतून अन्य साहित्य उपलब्ध नाही; त्यामुळे त्यांच्या जीवन-कार्याविषयी माहिती घेण्यासाठी वाचकांनी हे छोटेखानी चरित्र अवश्य वाचावे.