Amachi Mai | आमची माई

Amachi Mai | आमची माई
हजारो लेकरांची माय' असे संबोधले जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्या सहवासात राहून घेतलेल्या अनुभवांतून डी. बी. महाजन यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. सिंधूताईंच्या मनातील प्रखर आत्मविश्वास आणि पराकोटीची जिद्द यांचे दर्शन पुस्तकातून घडते. त्यांनी केलेला जीवनसंघर्षही समोर येतो. लेखकाने सिंधूताईंशी झालेली पहिली भेट रंगविली आहे. "अल्पावधीतच ते त्यांचे मानसपुत्र बनले. अनाथ मुलांसाठी सिंधूताईनी केलेले काम संकटांना पायाशी घालून कायम वास्तवाशी केलेला संघर्ष आणी त्यानंतर त्यांच्या कार्याला मिळालेली पावती आदी टप्पे या कथनात आले आहेत. त्यांच्या देश - विदेशातील दौऱ्यांची माहितीही समजते. आपले आयुष्यही त्यांच्या सहवासाने समृद्ध झाले असे महाजन सांगतात."