Amar Photo Studio |अमर फोटो स्टुडिओ

Amar Photo Studio |अमर फोटो स्टुडिओ
भविष्याच्या भीतीने घाबरलेला अपू आणि भूतकाळात रमणारी तनू दोघेही आत्ताच्या काळात प्रेमाचा शोध घेत आहेत. आणि अचानक ते दोघेही काळाच्या एका रीवर निघतात. एका कॅमेऱ्याच्या क्लिकने ते दोघे वेगवेगळ्या जगात आणि वेगवेगळ्या काळात जाऊन पोहोचतात. आकाशपाळण्याप्रमाणे घटनांच्या उंच-खोल झोक्यांचा अनुभव त्यांना येतो. तिथे त्यांना भूतकाळातली माणसं भेटतात, त्याचबरोबर काही अतरंगी अनुभवही येतात. तनू जाते तो काळ सत्तरच्या दशकातला, आणीबाणी आणि हिप्पी संस्कृतीचा. तर अपू जातो तो काळ स्वातंत्र्यपूर्व काळचा, चले जाओ आणि पहिल्यावहिल्या चित्रपटनिर्मितीचा. ही काळाची सैर त्यांना काय मिळवून देते? गोंधळ वाढवते की गुंते सोडवते याचं हे नाटक – अमर फोटो स्टुडिओ!