Ambedkar : Jivan Ani Varsa | आंबेडकर जीवन आणि वारसा

Ambedkar : Jivan Ani Varsa | आंबेडकर जीवन आणि वारसा
चरित्रात संक्षिप्तपणे, सुबोधपणे, मार्मिकपणे व आदरभावाने उलगडला आहे. दलित म्हणून जन्म घेतलेल्या आंबेडकरांना आलेले मानखंडना करणारे अनुभव, सामाजिक भेदभावामुळे त्यांच्या समोर उभ्या राहिलेल्या अडचणी आणि यांवर मात करून त्यांनी केलेलं कार्य याबद्दल इथे वाचायला मिळतं. अस्पृश्यता बेकायदेशीर ठरवण्यासाठी आंबेडकरांनी विविध संघर्ष कसे केले, त्या काळातील इतर महान राजकीय व वैचारिक व्यक्तिमत्वांशी त्यांचे कोणते वाद झाले, आणि व्यक्तीचे अविभाज्य अधिकार व सामाजिक न्यायाच्या आधुनिक संकल्पना स्वीकारलेलं दूरदर्शी संविधान त्यांनी भारतापुढे कसं मांडलं, याचा उहापोह सदर पुस्तकात आहे. आंबेडकरांनी भविष्यातील लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवलं, स्वतःच्या बुद्धिमत्तेचं बळ व लेखणीची ताकद यांद्वारे त्यांनी एका प्राचीन सभ्यतेला आधुनिक युगामध्ये आणून ठेवलं.