Amchi Mula Sagala Khatat ! | आमची मुलं सगळंsss खातात!

Amchi Mula Sagala Khatat ! | आमची मुलं सगळंsss खातात!
मुलांच्या आहाराविषयी मार्गदर्शन करणारे पुस्तक. 'आमची मुलं सगळं खातात!' या शीर्षकावरून तुम्हाला कल्पना आलीच असेल, की हे पुस्तक मुलांच्या आहाराशी संबंधित आहे. मुलांच्या खाण्या-पिण्याच्या तक्रारी पालकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. जवळपास प्रत्येक मुलामध्ये कधी ना कधी पोषक अन्नाला बघून नाक मुरडण्याचा (अव) गुण उफाळून येतोच. त्यामुळे पालकांच्या नाकी नऊ येते. वास्तविक, पोषक अन्न खाणे हा मुद्दा प्रत्येकासाठीच गहन व विचार करायला लावणारा एक मुद्दा बनलेला आहे, विशेषकरून मुलांच्या बाबतीत. कुणीतरी म्हटल्याप्रमाणे ‘आपण जे खातो तसेच बनतो’हे आपल्याला जरी पटत असलं तरी आहाराच्या बाबतीत योग्य मार्गदर्शन कुठेतरी कमी पडतं आणि त्यामुळे आहाराच्या चुकीच्या पद्धती अवलंबल्या जातात.याच सगळ्या शंकाचे निरसन आणि प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात दिली आहेत.