Amchya Ayushyatil Kahi Athvani | आमच्या आयुष्यातील काही आठवणी

Amchya Ayushyatil Kahi Athvani | आमच्या आयुष्यातील काही आठवणी
न्यायमूर्ती रानडे हे एकोणिसाव्या शतकातील अनेक चळवळीचे आधारस्तंभ होते. स्वातंत्र्य चळवळीबरोबरच सामाजिक, राजकीय, धार्मिक, नैतिक, औद्योगिक, शिक्षणविषयक विचारही ते करीत असत. निर्भीड न्यायमूर्ती म्हणून त्यांची ख्याती होती. त्या काळातील कर्मठपणाला त्यांनी कधी थारा दिला नाही. म्हणून तर, घरच्यांचा विरोध पत्करून त्यांनी पत्नी रमाबाईंना लिहायाला, वाचायला शिकवले. रमाबाई रानडे या न्यायमूर्ती रानडे यांच्या फक्त पत्नीच नव्हत्या तर त्यांच्या छाया होत्या. त्यांनी स्वतंत्रपणे लिहीलेले ' आमच्या आयुष्यातील काही आठवणी' हे आत्मचरित्र वाचताना रमाबाई यांचे व्यक्तिमत्त्व किती प्रभावी होते हे लक्षात येते. आपल्याला घडविणाऱ्या पतीचे गुणगान त्यांनी यात केले आहे . रानड्यांचा पुर्वेइतिहस , न्यायमूर्तींचे सार्वजनिक कार्य, याविषयी लेखन केले आहे. मुख्य भर आहे, तो त्यांच्या कौटुंबिक आठवणींवर. पत्नीने पत्तीबद्दल लिहिलेल्या या ग्रंथात न्यायमुर्तींचा स्वभाव , आयुष्यक्रम वाचायला मिळतो. या दोघांच्या आठवणीतून त्यांचे श्रेष्ठत्त्व अधोरेखित होते.