America Via London | अमेरिका व्हाया लंडन

America Via London | अमेरिका व्हाया लंडन
'अमेरिका व्हाया लंडन’ हे विलास खोले यांचे प्रवासवर्णन ही मराठीतील प्रवासवर्णनांत पडलेली एक चांगली भर आहे. लंडनमार्गे ते अमेरिकेला गेले. लंडनला राहिले. या मुक्कामावर आधारित `लंडन... एक धावती भेट’ हे प्रकरण लंडनची विविध स्थलवैशिष्ट्ये टिपणारे आहे. अमेरिकेतील अनेक महिन्यांच्या वास्तव्यात त्यांना जे अनुभव आले, अमेरिकेतला निसर्ग, अमेरिकन संस्कृती, अमेरिकन जीवनसृष्टी यांचा त्यांना जो परिचय घडला, अमेरिकेच्या भाग्यविधात्या राष्ट्राध्यक्षांची स्मारके, स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा, न्यूयॉर्क शहर यांचे ज्या जाणतेपणाने अवलोकन केले आणि अमेरिकेतील समृद्ध ग्रंथवैभवाचा जो मनमुराद आनंद त्यांनी लुटला, त्या सार्याचे विलास खोले यांनी केलेले ओघवत्या प्रसन्न शैलीतील हे कथन विलक्षण वाचनीय आहे.