Ameriki Rashtrapati | अमेरिकी राष्ट्रपती

Ameriki Rashtrapati | अमेरिकी राष्ट्रपती
जगातली सर्वांत प्रभावशाली व्यक्ती म्हणून वर्णन केल्या जाणार्या अमेरिकी अध्यक्षांविषयी माहिती देणारं हे पुस्तक अतुल कहाते यांनी लिहिलं आहे. अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यापासून ते मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांच्यापर्यंतच्या सगळ्या अध्यक्षांची ओळख त्यांनी करून दिली आहे. अमेरिकेतल्या जनतेची मानसिकता, तिथलं वातावरण, जगभरातल्या त्या-त्या वेळच्या स्थिती, वेगवेगळी युद्धं अशा अनेक गोष्टी या पुस्तकातून समजतात. प्रत्येक अध्यक्षाचा अल्प परिचय, त्याचं बालपण, जडणघडण, त्याची निवड होण्याची कारणं, त्याचा प्रचार, त्यानं अध्यक्ष म्हणून घेतलेले निर्णय, त्या निर्णयांमुळे झालेले परिणाम, गैरव्यवहार, ऐतिहासिक पायंडे अशा किती तरी गोष्टी कहाते यांनी या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत. अमेरिकेच्या मनोवृत्तीवर त्यांनी वेगळी टिप्पणीही केली आहे. सोप्या शब्दांत ओळख करून दिली असल्यामुळे पुस्तक रंजक झालं आहे.