Amrutachya Janu Onjali Shridhar Phadke Yancha Sangitik Pravas | अमृताच्या जणु ओंजळी श्रीधर फडके यांचा सांगीतिक प्रवास

Sukanya Joshi | सुकन्या जोशी
Regular price Rs. 540.00
Sale price Rs. 540.00 Regular price Rs. 600.00
Unit price
Amrutachya Janu Onjali Shridhar Phadke Yancha Sangitik Pravas | अमृताच्या जणु ओंजळी श्रीधर फडके यांचा सांगीतिक प्रवास

Amrutachya Janu Onjali Shridhar Phadke Yancha Sangitik Pravas | अमृताच्या जणु ओंजळी श्रीधर फडके यांचा सांगीतिक प्रवास

Regular price Rs. 540.00
Sale price Rs. 540.00 Regular price Rs. 600.00
Unit price
About The Book
Book Details
Book Reviews

ज्येष्ठ संगीतकार गायक श्री. श्रीधर फडके यांच्या ५० वर्षांच्या सांगीतिक कारकिर्दीचा आढावा घेणारं हे पुस्तक आहे. आई- वडिलांकडून मिळालेल्या उत्तम संस्कारांची शिदोरी घेऊन, श्रीधरजींनी स्वतःची स्वतंत्र आणि देखणी संगीत-वाट निर्माण केली. ‘संगीत मनमोही रे’ हे रसिकमनाला प्रत्येक कलाकृतीतून सुकन्या जोशी त्यांनी पटवून दिलं आहे. ‘गाणार, वाजविणार तैसेचि ऐकणार’ यावत् त्यांचं संगीत प्रत्येकाला मोहित करतं. श्रीधरजींची संगीताप्रती असलेली निष्ठा, आणि आजपर्यंत त्यांनी जोडलेली माणसं याचं दर्शन या पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणातून होत राहतं. या पुस्तकात त्यांचं कुठलंही गाणं नेमकं कसं ऐकायला हवं, याची दृष्टी ते आपल्याला देतात. कवीच्या शब्दांवर नितांत प्रेम करणारा हा संगीतकार आहे. कवितांचा भरपूर अभ्यास. त्या शब्दांचा स्वरांशी मेळ घालताना, शब्दांवर कुठेही कुरघोडी न करता, त्या काव्याच्या अर्थाला, भावनेला श्रीधरजी चाल लावतात. चालीवर शब्द लिहून घेतानाही, कुठेही शब्दांची ओढाताण होताना दिसत नाही. म्हणूनच त्यांचं कुठलंही गाणं ‘लय ललित ही रागिणी ‘असंच भासतं. जर एखाद्या अभ्यासकाला श्रीधरजींच्या गाण्यांचा अभ्यास करायचा असेल, किंवा त्यांच्या गाण्यांवर संशोधन करायचं असेल, तर हे पुस्तक त्यांच्यासाठी एक आदर्श ठरेल, असा विश्वास वाटतो. पुस्तक वाचताना ‘अमृताच्या जणू ओंजळी’ आहेत याचा अनुभव वाचकांना निश्चित मिळेल. त्यांच्या गाण्यांचा कॅनव्हास हिरव्या ऋतूसारखा कायम टवटवीत राहो, हीच ईश्वरचरणी मनोभावे प्रार्थना.

ISBN: 9789348643438
Author Name: Sukanya Joshi | सुकन्या जोशी
Publisher: Dimple Publication | डिंपल पब्लिकेशन
Translator:
Binding: Hardcover
Pages: 148
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products