Anadi Gopal | आनंदी गोपाळ

Anadi Gopal | आनंदी गोपाळ
एकदां उंबरठ्यावरचें माप कलंडून आत गेल्यावर, ज्या काळी स्त्रियांनी उंबरठ्याबाहेर डोकावून पाहणे ही मुष्कील असे, अशा काळांत कादंबरीकार श्री. ज. जोशी आपल्याला घेऊन जात आहेत. अनेकार्थांनी क्रांतिकारी अशा, गेल्या शतकाच्या उत्तरार्धांतील एका कालखंडाच्या या कहाणीचे सूत्रधार गोपाळराव जोशी यांच्या भेटीस . काहींसे निष्ठुर, एककल्ली, चक्रम आणि व्रात्य. परंतु त्याचबरोबर आपली दुसरेपणाची तरुण बायको आनंदी हिने शिकून जग गाजवावें या भव्य कल्पनेने झपाटलेले.सातासमुद्रापलीकडे एकट्याने प्रवास करून आनंदीबाईंनी डॉक्टरीची पदवी मिळविली; परंतु शारीरिक व मानसिक हालअपेष्टा सहन करून अमेरिकेत वैद्यकाची संजीवनी विद्या मिळवित असतांनाच प्राणघातक रोगाचें बीज त्यांच्या देहात रुजले. त्यानेच डॉक्टरीणबाईंचा बळी घेतला.आनंदी गोपाळच्या चरित्राचा दीर्घ व्यासंग, अतिशय रसाळ अशी निवेदनशैली, आणि कथाविषयाचा वेगळेपणा अन त्यांत ओतप्रोत भरून राहिलेलें नाट्य यांचीही जोड मिळालेली अशी ही आनंदी गोपाळ याची कथा वाचनीय तसेच हृद्य हेलावणारी आहे.