Ani Don Hat | आणि दोन हात

Ani Don Hat | आणि दोन हात
डॉ. वि. ना. श्रीखंडे यांच्या प्रेरणादायी व्यक्तीमत्वाची हि कहाणी. सर्वसामान्य घरातील मुलाने अत्यंत कठीण परिस्थितीशी सामना करून घेतलेल्या जागतिक भरारीचा हा आलेख आहे. वाचेत जन्मजात दोष असलेला, भाषांची अन् गणिताच्या आकडेमोडीची भीती असणारा मुलगा इंग्लडमधील एक आर. सी. एस. परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पार करून उत्तम सर्जन म्हणून नाम कमावतो, हे सारचं विलक्षण आहे. डॉ. श्रीखंडे यांनी स्वादुपिंड आणि पित्ताशयाच्या अवघड शस्त्रक्रियांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलं आहे. स्पेशलायझेशन आंतरराष्ट्रीय संघटनेच्या भारतातील शाखेच्या अध्यक्षपदाचा मान मिळवणारे ते देशातील पहिलेच सर्जन आहेत. आपल्या वैद्यकशास्त्रातील अनुभवाचा त्यांनी समाजासाठी उपयोग केला.