Ani Tarihi Mi | आणि तरीही मी
Ani Tarihi Mi | आणि तरीही मी
या काव्यसंग्रहातील कविता सौमित्रने मराठी काव्याची परंपरा पूर्णपणे झुगारून देऊन, स्वत:च्या स्वतंत्र अभिव्यक्तीतून घडवलेल्या कविता आहेत. यातील कविता कुठेच छंदोबध्द नाहीत, वृत्तबध्द नाही, नवकवितेप्रमाणे ती छंदमुक्त असली तरी ती नवकविताही नाही. मराठी काव्यातल्या कुठल्याही काव्यरचनेच्या प्रकाराशी तिचे साम्य नाही. त्यांनी घडवलेला कवितांचा घाट हा सर्वस्वी त्यांचा आहे. त्यांची कविता वास्तवातल्या दु:खद जिण्याला निकटपणे भिडलेली कविता आहे. तिचा मूळ गाभा वैयक्तिक जीवनानुभवाचा असला तरी मुंबईतल्या शहरी, यांत्रिक, साचेबंद जीवनाचा संदर्भ तिच्याभोवती जागा आहे.