Ankhi Chimanrao | आणखी चिमणराव

Ankhi Chimanrao | आणखी चिमणराव
चिं. वि. जोशी यांच्या चिमणराव या अजरामार व्यक्तिरेखेने विनोदी साहित्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. या पुस्तकात चिमणरावांच्या आणखी काही कथा वाचायला मिळतात. वयोपरत्वे गंभीर झालेला चिमणराव या कथांमधून समोर येतो. घरगुती नोकरांचा प्रश्न, चिमणरावांचे डोळे येतात, काटकसरीचे प्रयोग, वेड्यांचे इस्पितळ, गुंड्याभाऊंचे प्राणांतिक उपोषण, चिमणराव बिऱ्हाड बदलतात, मुलांची जिज्ञासा, स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग, काकुंचे देव पोरं ती पोरंच?, गुंड्याभाऊंचे दुखणे, चिमणरावांचे वक्तृत्व अशा १२ कथांमधून थोडे भोळसट पण सज्जन, पापभीरू "चिमणराव वाचायला मिळतात. गरिबीला कंटाळेल्या कडक स्वभावाच्या व्यवहारकुशल काऊताईची आणखी जवळून ओळख होते. उपहास शाब्दिक विनोदाचा समुच्चय कथांमधून अनुभवायला मिळतो."