Antariksha Bharari | अंतरिक्ष भरारी

Antariksha Bharari | अंतरिक्ष भरारी
विज्ञानातील शोध हे चित्तचक्षुचमत्कारिक वाटावे असे असतात. त्यामुळे बर्याचदा त्यांची तुलना रहस्यमय, रोमांचकारी कथा-कादंबर्यांशी केली जाते. अर्थात ही तुलना काव्यात्म पद्धतीची असते. कारण वैज्ञानिक शोधाला अनुमान, निरीक्षण आणि प्रयोग यांच्यातून सिद्ध झालेल्या सत्याचं कोंदण लाभलेलं असतं. हे शोध शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमाची निजखूण असते. २०१३ साली भारताने पाठवलेल्या मंगळ यानाने नुकताच मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला आहे. प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगावा अशी ही घटना आहे. तिचा साद्यंत वृतान्त प्रसिद्ध विज्ञान लेखक बाळ फोंडके यांनी 'अंतरिक्ष भरारी' या पुस्तकात मांडला आहे.रंजकपणे लिहिलेलं हे पुस्तक मंगळयान मोहिमेबाबतचं कुतूहल शमवत त्याची पूर्वपीठिकाही सांगतं.