Anunad | अनुनाद

Anunad | अनुनाद
अनुनाद हा सिनेमा आणि साहित्य यात सारख्याच ताकदीने वावरणाऱ्या अरुण खोपकर यांच्या १४ लेखांचा संग्रह आहे. सौंदर्य आणि जीवनोत्सुक वृत्तीने परस्परांशी जोडलेले हे लेख कुतुहल जागवणाऱ्या व सहज भाषेतून वाचकांशी संवाद करतात. शब्दांचे विविध भाषा विभ्रम व ग्रंथ रूप सौंदर्य हा शब्द या पहिल्या भागाचा आधार आहे. शब्दचित्र याभागात अनेकांची आत्मीय शब्द शिल्पे आहेत.अंतिम भागात नाद लय ध्वनीचा दीर्घ प्रवास दाखवला आहे. माहितीचे नेमकेपण, थक्क करणाऱ्या अंतर्दृष्टीच्या व प्रज्ञे च्या जागा असलेले, व्यक्तीच्या जाणिवा विस्तारणारे आणि संस्कृती समृद्ध करणारे हे पुस्तक ' वाचलेच पाहिजे ' या श्रेणीतले आहे.