Apala Vishwa Ani Tyachi Navalkatha | आपलं विश्व आणि त्यांची नवलकथा

Apala Vishwa Ani Tyachi Navalkatha | आपलं विश्व आणि त्यांची नवलकथा
विश्वाचा उगम कसा झाला असेल ? विश्वाच्या या अफाट पसाऱ्यात आपलं स्थान काय ? हे प्रश्न हजारो वर्षांपासून माणसाच्या सोबत आहेत. त्याची उत्तरंही वेगवेगळ्या संस्कृती सभ्यतांमध्ये उत्पत्तीकथांमार्फत द्यायचा प्रयत्न झाला, तर आधुनिक काळात माणसाने ही कोडी विज्ञानाच्या साहाय्याने सोडवली आणि अजूनही ही प्रक्रिया सुरूच आहे.थोडक्यात, विश्व समजून घेण्याचा माणसाचा प्रवास हजारो वर्षांपासूनचा आहे. या प्रवासाचीच ही उद्बोधक गोष्ट कुमारांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कुतूहल शमवणारं…. "मायमराठीत सोप्या पद्धतीने अनेक वैज्ञानिक संकल्पना समजावून सांगणारं…" रंजक आणि तितकीच सखोल माहिती देणारं… आपल्याकडे असलंच पाहिजे असं मस्ट रीड पुस्तक… आपलं विश्व.