Apali Mula Ani Apan | आपली मुलं आणि आपण

Apali Mula Ani Apan | आपली मुलं आणि आपण
मोठी माणसं आपलं दुःख नेमक्या शब्दात व्यक्त करू शकतात. लहान मुलं मनातल्या गोष्टी शब्दबद्ध करू शकत नाहीत. त्या त्यांच्या वागण्यातून प्रकट होतात. लेखक डॉ.मनोज भाटवडेकर यांच्याकडे वर्तनोपचारासाठी येणाऱ्या मुलांची विविध रूपं पाहायला मिळतात. हट्टी ,चिडचिडी,रागीट,अबोल,आक्रमक, घाबरलेली ,निराश,चिंताग्रस्त,खोटं बोलणारी,गोंधळलेली तसेच पालकांचीही अनेक रूपं दिसतात मुलांवर अविश्वास दाखवणारे, मुलांकडे दुर्लक्ष करणारे,अजिबात लक्ष न देणारे किंवा अति लक्ष देणारे, परस्पर विरोधी मते देणारे थोडक्यात मुलांच्या मानसिक प्रकियेचा वेध न घेऊ शकणारे. तरी या जंजाळात चांगली मुलं निपजताहेत -त्यांना घडवणारे सुजाण पालकही आहेत. काही पालकांना मुलाचे अचूक भान आहे या लेखांमधून अशाच काही समस्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे .यातील व्यक्तींची नावे काल्पनिक आहेत किंवा तपशील थोडे बदलले आहेत. व्यावसायिक गुप्तता राखण्यासाठी ते आवश्यक होते. पण यात मांडलेले प्रसंग, घटना खऱ्या आहेत. या पुस्तकामध्ये विविध प्रसंग-घटना यांचे संदर्भ देत,पालकांना केलेले मार्गदर्शन असे स्वरूप असल्यामुळे हे पुस्तक सर्व पालकांना अतिशय उपयुक्त आहे. हे प्रसंग प्रत्येक पालकाला आपल्या मुलाचे किंवा आपल्या घरात घडलेले वाटतील.