Aparajita | अपराजिता

Aparajita | अपराजिता
आ. डॉ. नीलम गोऱ्हे ! गेली 35 वर्षे महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारतीय राजकीय-सामाजिक अवकाशात विजेच्या प्रखर तेजाने तळपणारं व्यक्तिमत्त्व.वैचारिक स्पष्टता, पक्की बैठक, प्रखर बुद्धिमत्ता, निर्भीडपणा, कामाचा झपाटा, संवेदनशीलता आणि कुठल्याही घटनेकडे पाहण्याचा लोकशाहीवादी, समतावादी, न्यायवादी दृष्टिकोन यांमुळे नीलमताईंची स्वतंत्र आणि खास अशी मुद्रा सामाजिक क्षेत्रावर उमटली आहे.सामाजिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी नीलमताईंचे काम हा एक वस्तुपाठ आणि अभ्यासकांसाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरावा.'अपराजिता' या पुस्तकात त्यांचा सामाजिक आणि राजकारणातील प्रवास अंजली कुलकर्णी यांनी मांडला आहे.