Aranyak |आरण्यक
Aranyak |आरण्यक
'आरण्यक' हे रत्नाकर मतकरी यांचे पद्मबंधातले पौराणिक नाटक आहे. याची कथा महाभारतातील आहे. भारतीय युध्दानंतर धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, विदुर वनात जातात, ती ही कहाणी.मरणक्षणीही चंचल चित्त असणारा धृतराष्ट्र, गंभीर पण भावनांनी ओलावलेली कुंती, गांधारी आणि विदुर ही यातली प्रमुख पात्रे आहेत. विजयी होऊनही पश्चात्तापाने पोळलेला युधिष्ठिर यांच्या मानाने उणा आहे. धृतराष्ट्राची व्यक्तिरेखा अत्यंत प्रत्ययकारक आहे. अंधाची कोवळीक तिच्यात आहे आणि अंधत्वाचे दु:ख आणि अखेर वरदानही तिच्यातच आहे.या नाट्यवस्तूचे वैशिष्ट्य असे आहे की, ग्रीक ट्रॅडेजीच्या स्वरूपात ही बांधली गेली आहे.