Ardhanari | अर्धनारी
Ardhanari | अर्धनारी
अर्धनारी ही कादंबरी म्हणजे मूळ कादंबरीच्या दोन कल्पक आनुषंगिक भागांपैकी एक होय. ‘वन पार्ट वुमन’ च्या शेवटी कालीने पोन्नाला शिक्षा करायचा कठोर निश्चय केलेला असतो. तिने त्याचा पुर्ण विश्वासघात केल्याची त्याची खात्रीच पटलेली असते. परंतु, पोन्नाचा स्वत:चा दोष नसताना तिला जे प्रायश्चित घ्यायला भाग पाडलं जातं, त्यापायी तीही अतिशय अस्वस्थ होते. मंदिरोत्सवपश्चात दोघांनाही त्यांच्या आधीच्या आदर्श सहजीवनाच्या नव्या आणि कठोर अनिश्चिततेचा सामना करावा लागतो. मुरूगन यांच्या जादूई बोटांतून सहज झरणारी ही कथा एका आश्चर्यकारक आणि नाट्यपूर्ण निष्कर्षाला पोहोचते.