Are Sarkar Sarkar! : Janteshi Bhet Mazi Ghadva |अरे सरकार सरकार!: जनतेशी भेट माझी घडवा

Are Sarkar Sarkar! : Janteshi Bhet Mazi Ghadva |अरे सरकार सरकार!: जनतेशी भेट माझी घडवा
( ३ एकांकिकांचा संग्रह) : नव्या महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण नेहमी हि कथा सांगायचे. लहानपणी आमच्या गावात 'सरकार' चा फार दरारा होता. त्या वेळी ब्रिटिशांचं राज्य होतं..... मी नेहमी ऐकायचो, 'सरकारने हे केले'..... 'सरकारने ते केले. ' हे ' 'सरकार' पाहण्याची मला फार उत्सुकता होती.... "आमच्या गावाच्या पाटलांना सगळे 'सरकार' म्हणायचे. सरकारच्या समोरून बायाबापड्या चपला हातात घेऊन जायच्या. त्यांच्यासमोर बघण्याची कुणाची छाती नव्हती सगळं गाव त्यांना चळाचळा कापायचं... मी त्यांनाच 'सरकार' समजत असे.... पण एकदा गावात फौजदार आला आणि पाटील होत जोडून त्यांच्यापुढे उभे राहिले अन 'सरकार ! सरकार !' म्हणू लागले- त्या वेळी मला वाटलं 'अरे हे खाकी कपड्यातले साहेब म्हणजे सरकार... " पण स्वातंत्र्याच्या आंदोलनात कराडच्या मामलेदार कचेरीवर तिरंगी झेंडा लावला. अन हजारो लोकांसमोर फौजदार हात जोडून विनवण्या करताना पाहिलं अन त्या वेळी कळले... जनता म्हणजे सरकार.... सरकारांचे सरकार.....