Arta | आर्त

Arta | आर्त
कादंबरीचे कथानक हे पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगना या जिल्ह्यातील आहे. या जिल्ह्यातील काकद्वीप परिसरातून दरवर्षी गंगासागर यात्रेच्या काळात पंधरा वर्षांखालील मुली गायब होण्याचे प्रकार घडतात. या मुलींना कोण पळतीत असावं? या मागे आंतरराष्ट्रीय स्वरुपाचं एखादं रॅकेट कार्यरत असावं का? या घटना दरवर्षी होतात तरी या काळात या मुलींचे पालक विशेष काळजी घेत नसावेत का? या कादंबरीतील निम्नस्तरातील भोई जनजातीची नायिका दामाय हिची चित्रांशी नावाची सातव्या वर्गात शिकणारी मुलगी याच काळात हरवते. या घटनेने दामाय हादरते. आपल्या हरवलेल्या चित्रांशीचा शोध घेताना ती आत्यंतिक आर्त, व्याकुळ, व्यथित, दु:खी-कष्टी होते. मात्र, असहाय्य होत नाही, कारण पश्चिम बंगालची प्रत्येक नारी म्हणजे दुर्गा-महाकाली, याचं प्रत्यंतर ती जागोजागी देते. कुटुंबप्रखानं दुर्लक्ष केल्यावर जाणीवपूर्वक तिनं नवरा, नातेवाईक, गावप्रमुख, पोलिस यांच्याविरुद्ध दिलेला उग्र लढा म्हणजे ही 'आर्त' कादंबरी.'