Artificial Intelligence |Deepak Shikarpur) | आर्टिफिशियल इंटेलिजन्स |दीपक शिकारपूर)

Artificial Intelligence |Deepak Shikarpur) | आर्टिफिशियल इंटेलिजन्स |दीपक शिकारपूर)
कृत्तीम बुद्धिमत्ता क्षेत्रातील ही झेप अनेक क्षेत्रांवर आपला प्रभाव दाखवायला नजीकच्या काळात सुरुवात करेल. अनेक क्षेत्रे या तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र बदलतील . येत्या दहा पंधरा वर्षांच्या काळात रोबो (यंत्रमानव) हा सर्वसामान्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटक बनेल अर्थात हे भविष्य ध्यानात घेऊन शिक्षणक्रम, ते शिकवणार्या संस्था आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती ह्यांमध्येही कालानुरूप बदल व्हायला हवे.. शाळकरी मुलेमुली आणि महाविद्यावयीन युवा पिढीतील कल्पकता आणि नवनिर्मितीच्या ईर्ष्येला प्रोत्साहन मिळाले पाहिजे कारण अशाच व्यक्ती चाकोरीबद्ध कामांवर (-जी कमी होत जाणार आहेत) अवलंबून न राहता स्वतःला आणि समाजाला पुढे नेऊ शकतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्र सतत बदलत आहे. बदल समजून घेणे व आत्मसात करणे हे एक कठीण काम एकविसाव्या शतकात जन्मलेल्या पिढीला करावे लागणार आहे बदलत्या तांत्रिक संकल्पनांमुळे शिक्षणपद्धती आमूलाग्र बदलेल हे पुस्तक लिहायचा खरे तर हाच हेतू आहे.