Ase Ghadva Mulanche Vyaktimattva | असे घडवा मुलांचे व्यक्तिमत्त्व

Ase Ghadva Mulanche Vyaktimattva | असे घडवा मुलांचे व्यक्तिमत्त्व
'असे घडवा मुलांचे व्यक्तिमत्त्व' या डॉ. रमा मराठे यांच्या पुस्तकाद्वारे पालकांना मुलांच्या यशस्वी आयुष्याचा पाया रचायला मदत केली आहे. मुलांशी पालकांचे वर्तन कसे असावे, त्यासाठी पालकांनी स्वत:त कोणते बदल घडवायला हवे, विचारसरणी कशी बनवायला हवी या साध्या पण प्रत्यक्षात कठीण बाबींवर पुस्तकातील प्रकरणांमधून मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी केवळ उपदेशपर लेखन न करता उदाहरणांवर लेखिकेने भर दिला आहे. खेळाद्वारे व्यक्तिमत्त्व विकास, मुलांवर जबाबदारी टाकणे, वेळेचे नियोजन असे उपायही सुचविण्यात आलेले आहे. सुजाण पालक बनण्याचे ओझे न बाळगता मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी मानसशास्त्रीय तत्त्वांचा आधार घेऊन यातील उपाय सुचविण्यात आले आहेत.