Ashram Navacha Ghar | आश्रम नावाचं घर

Ashram Navacha Ghar | आश्रम नावाचं घर
हे पुस्तक पीडित स्त्रियांसाठी असणार्या एका आश्रमाबाबत आहे. आश्रमाच्या स्थापनेपासून सुरू झालेल्या प्रवासाचे या पुस्तकात वर्णन करण्यात आले आहे. ओघवत्या शैलीतील हे लिखाण वाचनीय झाले आहे. छोट्याशा बीजाचे एका विशालकाय वटवृक्षात रूपांतर होते; तेव्हा त्याचा डोलारा डोळ्यांचे पारणे फेडतो. त्या वृक्षाच्या छायेखाली अनेकजण विसावतात, त्यात जुने नवे वाटसरू येत राहतात. तो मात्र सावली धरण्याचे कार्य अव्याहतपणे करतच असतो. अशीच निराश्रितांना मायेची ऊब, सावली देणार्या श्रद्धानंद आश्रमाची ही कहाणी आहे. शिरीष पै यांनी दिलेल्या प्रस्तावनेत आश्रमाला 'वटवृक्षाचीच उपमा' दिल्याने ती सार्थच ठरल्याचे जाणवते.