Aswasth Parv - Vedh Jagtik Ghadamodincha | अस्वस्थपर्व - वेध जागतिक घडामोडींचा

Aswasth Parv - Vedh Jagtik Ghadamodincha | अस्वस्थपर्व - वेध जागतिक घडामोडींचा
एका बाजूला प्रचंड कुतूहल वाटावं आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड अस्वस्थता असावी अशा काळातील जागतिक घडामोडींचा वेध प्रस्तुत लेखन घेतं. प्रगतीसाठीची धोरणं राबवताना जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग सर्वांना व्हावंच लागेल ; ही वाटचाल उदारमतवादी लोकशाही बळकट करणारी ठरेल ; लोक जगाच्या व्यवहारात इतके सामावले जातील , की ते जागतिक नागरिक म्हणवणं पसंत करतील ; त्यातून राष्ट्र - राज्य संकल्पनेतील सीमारेषाही धूसर व्हायला लागतील ; या आदर्शवादाला ,त्यातील गृहीतकांच्या फुग्याला तीस वर्षांच्या वाटचालीनंतर टाचणी लावणारं वळण जागतिक व्यवहारात आलं आहे. हे का आणि कसं घडत गेलं ,या प्रश्नाचा शोध हे पुस्तक घेतं.