At Any Cost | ऍट एनी कॉस्ट

At Any Cost | ऍट एनी कॉस्ट
दूरदर्शनच्या उदयानंतर खरेतर नाटक व चित्रपट या दोन प्रांतात बहरलेल्या दृक-श्राव्य सर्जनाला एक निराळी वाट मिळाली होती, कारण हे माध्यम थेट प्रेक्षकाच्या घरात पोचत होते. पण सुरवातीला काही अपवाद वगळता दिग्गजांनी या माध्यमाकडे दुर्लक्ष तरी केले किंवा उपहास तरी केला. पण काही दशकातच हे माध्यम इतके विस्तारले की आता त्याच्याशिवाय तरणोपाय नाही हे सर्वांनाच उमजले. 'अॅट एनी कॉस्ट'च्या केंद्रस्थानी सर्जनशील आणि उच्च अभिरुचीच्या कलावंतांची हीच गोची आहे. उच्च अभिरुचीची नाटके चालत नाहीत, पण जिथे वारेमाप पैसा आहे, त्या चॅनेल्सच्या माध्यमात तर अत्यंत मीडिऑकर आणि सवंग काही दिल्याशिवाय चालतच नाही, या गोचीमुळे हवालदिल झालेल्या सच्च्या आणि अभिजात कलावंतांची ही शोकांतिका आहे.