Atarapi | अतरापी

Atarapi | अतरापी
तशी सकृत्दर्शनी ही दोन भावांची-कुत्र्यांची-कथा एक भाऊ स्वतंत्र विचारांचा त्याचं आयुष्य एक खळाळता प्रवाह असतो; नात्यांना, विकारांना न जुमानणारा. आयुष्य समरसून पण अलिप्तपणे जगणारा दुसरा भाऊ सरळमार्गी आयुष्य जगणारा नातेसंबंध जपणारा रूढी, परंपरा, नीतिनियम यांचं पालन करणारा आध्यात्मिक विचारांचा त्या भावांचा जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास ही ‘अतरापी’ची कहाणी. हे भाऊ जन्माला येणा-या जीवांचं प्रातिनिधिक रूपक आहे. ओघवत्या, रसाळ शैलीतली ही ‘वेगळी’ कादंबरी वाचकांना अंतर्मुख व्हायला, विचार करायला प्रवृत्त करते. सृष्टिकत्र्याच्या इच्छेने जन्म घेणारा जीव असतो परका ति-हाईत एक अतरापी!