Atha To Dnyanjidnyasa | Part : 1 | अथा तो ज्ञानजिज्ञासा | भाग : १
Atha To Dnyanjidnyasa | Part : 1 | अथा तो ज्ञानजिज्ञासा | भाग : १
काहीतरी नवे शोधण्याचा, जाणून घेण्याचा ध्यास माणसामध्ये असतोच. प्रस्थापित उत्तरांनी ज्यांचे समाधान होत नाही, ते अस्वस्थ. शंका उपस्थित करतात. उत्तरे शोधण्यासाठी जिवाचे रान करतात व उत्तर सापडले यातच धन्यता मानतात. या धडपडीचा मोबदला काय, हा विचार त्यांच्या मनाला शिवत नाही. निरपेक्ष जिज्ञासा म्हणतात, ती हीच. प्रतिभावंतांच्या या वृत्तीमुळेच ज्ञान, विज्ञान, तत्त्वज्ञान, साहित्य, कला यांची प्रगती झाली. अशा जिज्ञासेला चाळविण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. वैचारिक संस्कृती जोपासण्यासाठी जिज्ञासेचा प्रेरणा हा केंद्रबिंदू धरून केलेले हे लेखन आहे.