Athato Dnyanjidnyasa : | Part - 2) | अथातो ज्ञानजिज्ञासा : | भाग - २)

Athato Dnyanjidnyasa : | Part - 2) | अथातो ज्ञानजिज्ञासा : | भाग - २)
या पुस्तकातून निवडक व्यक्तिमत्त्वे, संकल्पना, समस्या तसेच घटना-घटिते या गोष्टींविषयी तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, राजकारणी, विचारवंत, साहित्यिक, कलावंत, देशभक्त यांसारख्या (बहुसंख्य विदेशी) व्यक्तिमत्त्वांविषयी लिहिले आहे. त्यातले काही विसंगतींनी भरलेले, विक्षिप्त, मतलबी असले तरी ज्या ध्येयाने ते झपाटले गेले त्याच्याशी प्रामाणिक राहिले आहेत. पत्कारलेल्या वाटेतील काटे, क्लेश, कष्ट, धोके, उपेक्षा, तिरस्कार, हिंसाचार यांची त्यांनी तमा बाळगली नाही. हे बहुतेक सर्व कर्मयोगी कोटीला पोहोचलेले असून मानवजात एकच आहे असा संस्कार ते रुजवितात. एका वाचकाने जिज्ञासूंशी साधलेला मुक्त संवाद अशा स्वरुपाचे हे पुस्तक वाचकांशी जिज्ञासापूर्ती करेलच आणि त्यांना वाचनानंदही देतील.